जर तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्डमध्ये काही त्रुटी असतील. त्यात सुधारणा करायची असेल तर ई सेवा केंद्रात जावे लागेत. त्यात जर त्या कार्यालयात गर्दी असली तर त्याच दिवशी तुमचं काम होत नाही. शिवाय प्रत्येक कार्डसाठी वेगवेगळ्या
कार्यालयात जाऊन अपडेट करावे लागते. प्रत्येक कार्यालयाला जाणं अनेकांना
त्रासदायक ठरत असतं. तुम्हालाही तुमच्या आधार कार्ड, पॅन कॉर्ड किंवा मतदान
कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी
महत्त्ववाची आहे.
सरकार लवकरच अशी डिजिटल प्रणाली सुरू
करणार आहे. याद्वारे तुमचे सर्व महत्त्वाचे ओळखपत्र एकाच ठिकाणी अपडेट केले
जातील. या एकत्रित डिजिटल ओळख प्रणालीमुळे आवश्यक अपडेट्स फक्त ३ दिवसांत
केले जातील. केंद्र सरकारच्या या पोर्टलद्वारे लोक आधार, पॅन, ड्रायव्हिंग
लायसन्स, पासपोर्ट यासह सर्व महत्त्वाचे ओळखपत्र एकाच ठिकाणी अपडेट करू
शकतील. जर तुम्हाला तुमचे नाव बदलायचे असेल, तुमचा मोबाईल नंबर अपडेट
करायचा असेल किंवा नवीन पत्ता जोडायचा असे.
तर ते काम तुम्ही एकाच ठिकाणी अपडेट करू शकाल. शिवाय सर्व कागदपत्रे आपोआप अपडेट होतील. वेगवेगळे कागदपत्रे एकाच इंटरफेसशी जोडली जातील अशा पद्धतीने पोर्टल तयार केले जात आहे. यासाठी युझर्स पोर्टलला भेट द्यावी लागेल आणि नाव बदलणे, मोबाईल नंबर बदलणे किंवा पत्ता अपडेट करणे हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अपडेट प्रक्रिया केवळ तीन दिवसांत पूर्ण केली जाईल.अपडेटनंतर जर तुम्हाला नवीन ओळखपत्र हवे असेल तर तुम्ही पोर्टलवरच अर्ज करू शकाल. पण यासाठी आवश्यक शुल्क भरावे लागेल. त्यानंतर ७ कामकाजाच्या दिवसांत अपडेट केलेले ओळखपत्र पोस्ट ऑफिसद्वारे तुमच्या घरी येईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही जवळच्या कार्यालयातून नवीन कागदपत्र देखील घेऊ शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.