Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी?

फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी?



शिर्डी:  शिर्डीत भिकारी धरपकड मोहीमेत 50 पेक्षा अधिक भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात अनेक भिकारी इंग्रजीत बोलत भीक मागत असल्याचं दिसून आलं. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी एक भिकारी इस्त्रोमध्ये अधिकारी असल्याचं सांगत असल्यानं शिर्डीतील पोलीस देखील अचंबित झाले आहे.


के एस नारायण असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. केरळ येथील रहिवाशी असल्याचं कारवाईत सापडलेल्या नारायण यांनी सांगितलं. शिर्डी पोलीस, शिर्डी नगरपरिषद आणि साई संस्थान यांच्या संयुक्त कारवाईत 50 भिकारी ताब्यात घेण्यात आले होते. इस्त्रोमधील माजी अधिकारी असल्याचं नारायण यांनी सांगितल्यानंतर पोलीस देखील चकीत झाले. पोलीस के एस नारायण यांची संपूर्ण माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नारायण शिर्डीत कसे आले याबाबतची माहिती मिळवून त्यांचा दावा खरा आहे की खोटा हे तपासत आहेत.


के एस नारायण काय म्हणाले?

के एस नारायण यांनी सांगितलं की, "माझं M. Com पर्यंत शिक्षण झालं आहे. मी इस्रोमध्ये नोकरीला होतो, आता निवृत्त झालो आहे. माझा मुलगा शिक्षणासाठी यूकेमध्ये आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी मी नेहमी शिर्डीला येतो. यावेळी मी आलो तेव्हा माझी बॅग नाशिकला चोरीला गेली. त्यात माझं आयकार्ड, आधारकार्ड असं सगळं साहित्य होतं. माझ्याकडे पैसेही नव्हते. म्हणून भाविकांकडून पैसे मागून इथे राहत होतो. मी आज संध्याकाळच्या ट्रेनने पुन्हा सिंकदराबादला जाणार होतो."

पीएसएलव्ही, जीएसएव्ही, चांद्रयान मोहिमेदरम्यान मी इस्रोमध्ये नोकरीला होता. तिथे मला सगळे ओखळतात. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक ए. राजराजन माझे मित्र आहेत", दावा देखील के एस नारायण यांनी केला आहे. शिर्डी पोलिसांनी त्याची संपूर्ण माहितीची खात्री करणं तसेच त्याचे स्टेट बँकेतील अकाऊंट तसेच इतर प्रोफाईल चेक करणं सुरु आहे. सध्या त्याला इतर भिकाऱ्यांपासून वेगळं बसवलं आहे. तर इतर बाबींची खात्री तसेच त्यांनी दिलेली माहीतीची पडताळणी पोलीस करत आहेत. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.