Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सिलेंडरच्या दरात मोठी कपात, तुमच्या शहरातील दर किती?

Breaking News!  सिलेंडरच्या दरात मोठी कपात, तुमच्या शहरातील दर किती?
 

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४१ रुपयांने कमी केल्या आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचे वृत्त दिले आहे. १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईमध्ये १७१३.५०रूपयांना मिळणार आहे.

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घट केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ४१ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. नवे दर आजपासून (१ एप्रिल २०२५) लागू करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १,७६२ रुपये इतकी आहे. हवाई इंधनाच्या (एटीएफ) किमतीतही ५,८७०.५४ रुपये प्रति किलोलीटरने कपात करण्यात आली आहे. आजपासून देशभरात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ४१ रुपयांनी कमी करण्यात आली असून, ही नवीन किंमत आज, १ एप्रिल २०२५ पासून लागू झाली आहे. नवी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आता १,७६२ रुपये इतकी आहे. याशिवाय, हवाई इंधनाच्या (एटीएफ) किमतीतही ५,८७०.५४ रुपये प्रति किलोलीटरने कपात करण्यात आली आहे. या नवीन किमती आजपासून देशभरात लागू झाल्या आहेत.
एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात. जागतिक कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि इतर आर्थिक घटकांच्या आधारावर गॅसच्या किंमतीत बदल केला जतो. व्यावसायिक एलपीजीच्या दरांमध्ये वारंवार बदल होत असताना, घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजीच्या किमती स्थिर आहेत. IOCL च्या संकेतस्थळानुसार, १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईमध्ये १७१३.५०रूपयांना मिळणार आहे. कोलकात्यामध्ये १८६९. ५०, चेन्नईमध्ये १९२१.५० रूपयांना सिलिंडर मिळेल. याआधी एक जानेवारी आणि फेब्रुवारी, मार्च महिन्यात व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. तर डिसेंबर २०२४ मध्ये गॅस सिलिंडरच्या दरात १४ रूपयांनी वाढ करण्यात आली होती.

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही -
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च २०२५ मध्ये १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅसच्या किंमतीत बदल झाला होता, त्यावेळी गॅसच्या किंमती १०० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. दिल्लीमध्ये ८०३, कोलकात्यात ८२९, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळतोय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.