Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! भारत-पाकिस्तान युद्धाची तयारी, तणावाच्या वातावरणात तब्बल 85 हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर

Breaking News ! भारत-पाकिस्तान युद्धाची तयारी, तणावाच्या वातावरणात तब्बल 85 हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर
 

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. मात्र त्याचदरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एक मोठा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याला इम्पोर्ट स्कॅम असं नाव देण्यात आलं आहे.


रिपोर्टनुसार भारतामधील सामान दुसऱ्या देशांच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये पोहोचत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील थेट व्यापार बंद आहे, असं असताना देखील हा घोटाळा घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा घोटाळा 10 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 85 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचा आहे. आर्थिक थिंक टँक जीटीआरआयच्या माध्यमातून हा घोटाळा समोर आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

जीटीआरआयच्या रिपोर्टनुसार भारतातून दरवर्षी 10 अब्ज डॉलर किंमतीचा विविध माल दुबई, सिंगापूर आणि कोलंबो बंदरातून अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानमध्ये पाठवला जात आहे.जीटीआरआयनं केलेल्या दाव्यानुसार भारतीय कंपन्या या बंदरावर माल पाठवतात, त्यानंतर तिथे एक स्वतंत्र कंपनी हा माल आपल्या ताब्यात घेते. बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये हा मला साठवला जातो.येथे वाहतुकीदरम्यान शुल्क न भरता माल ठेवता येतो. त्यानंतर मूळ देश दुसरा दाखवण्यासाठी वस्तूंचे लेबल आणि कागदपत्रे बदलली जातात.त्यामुळे हा माल भारतामधून नाही तर दुसऱ्याच कोणत्यातरी देशातून आला आहे, असे भासवले जाते. नंतर हा मला जास्त किंमतीला विकला जातो.

यासंदर्भात जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी माहिती देताना म्हटलं की, हे मॉडेल बेकायदेशीर नसले तरी यामुळे दिशाभूल होते.जीटीआरआय अंदाजानुसार या मार्गानं दरवर्षी तब्बल 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू भारतातून पाकिस्तानला जातात.या संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये
 
भारताची पाकिस्तानला निर्यात 447.65 दशलक्ष डॉलर्स होती. मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार देखील थांबला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सरकार देखील या घोटाळ्याची माहिती घेत असून,भारतातून पाकिस्तानला अप्रत्यक्ष निर्यात किती झाली, याची आकडेवारी गोळा करण्याचं काम सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.