Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! तब्बल 61 हजार पगार...तातडीने अर्ज करा!

Breaking News! तब्बल 61 हजार पगार...तातडीने अर्ज करा!
 
 
राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा विकास व्हावा, तसेच शासनाच्या कार्यपद्धतीत नवचैतन्य यावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत एकूण 60 फेलोंची निवड करण्यात येणार असून, त्यापैकी 1/3 महिला फेलोंची निवड आरक्षित असेल. या फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्यासाठी mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन परीक्षा शुल्क ५०० रुपये भरावे लागणार आहे.

अर्जासाठी आवश्यक अर्हता :

भारताचा नागरिक असणे आवश्यक

कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60% गुणांसह)

किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ अनुभव / इंटर्नशिप / आर्टीकलशिप / स्वयंरोजगाराचा अनुभव

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान

संगणक व इंटरनेट हाताळणीचे ज्ञान

वयोमर्यादा : 21 ते 26 वर्षे

निवड प्रक्रिया :
ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरल्यानंतर ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर गुणांच्या आधारे निवडलेल्या 210 उमेदवारांना निबंध लेखन करावे लागेल. अंतिम टप्प्यात या उमेदवारांची मुलाखत मुंबईत घेण्यात येईल.
मानधन आणि कामकाज :

निवड झालेल्या फेलोंना दरमहा रु. 56,100/- मानधन आणि रु. 5,400/- प्रवास भत्ता असे एकूण रु. 61,500/- दिले जाणार आहे. फेलोंची नियुक्ती १२ महिन्यांसाठी केली जाईल. निवड झालेल्या फेलोंना जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या अधिपत्याखाली काम करण्याची संधी मिळेल.

शैक्षणिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम :
फेलोशिपचा एक भाग म्हणून IIT मुंबई यांच्या सहकार्याने "सार्वजनिक धोरण" या विषयावर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. सुरुवातीला दोन आठवडे, सहा महिन्यांनंतर एक आठवडा आणि शेवटी एक आठवड्याचे ऑफलाईन व्याख्यान सत्र घेतले जाईल. याव्यतिरिक्त गरजेनुसार ऑनलाइन व्याख्यानेही घेतली जातील. कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर IIT मुंबईमार्फत प्रमाणपत्र आणि शासनामार्फत फेलोशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.फेलोशिपद्वारे तरुणांना धोरण निर्मितीतील सहभाग, शासकीय योजना अंमलबजावणीतील अनुभव व सामाजिक भान प्राप्त करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.