जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांचा जीव घेतला. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण आहे. याचवेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. शाहिद आफ्रीदीने भारत आणि भारतीय
लष्करावर टीका केली आहे. शाहिद आफ्रीदीने पहलगाम येथील दहशतवादी
हल्ल्यासाठी भारतीय लष्कराला जबाबदार ठरवले आहे. तसेच त्याने भारतीय
लष्कराला 'बेकार' असे म्हटले आहे.
शाहिद आफ्रीदीने पाकिस्तानी चॅनेलवर समा टीव्हीवर बोलताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतीय लष्कराविरुद्ध बोलताना शाहिद आफ्रीदी म्हणाला, "फटाका देखील फुटला तरी (जम्मू-कश्मीरमध्ये) पाकिस्तानने केले असे म्हणतात. काश्मीरमध्ये तुमच्या 8,00,000 सैनिकांची फौज आहे आणि तरीही असे घडले. याचा अर्थ तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात, कारण तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकला नाही."
शाहिद आफ्रीदीने ओलांडल्या मर्यादा
शाहिद आफ्रीदीने याशिवाय पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कव्हरेजसाठी भारतीय मीडियावरही टीका केली आहे. शाहिद आफ्रीदी म्हणाला, "आश्चर्याची गोष्ट म्हणजे हल्ल्यानंतर एका तासातच त्यांचा मीडिया बॉलिवूड बनला. देवाच्या कृपेने, प्रत्येक गोष्ट बॉलिवूड बनवू नका. मी थक्क झालो, खरेतर मी मजा घेत होतो, ज्या पद्धतीने ते बोलत होते. मी म्हणत होतो, पाहा यांचा विचार, हे स्वतःला सुशिक्षित म्हणवतात."शाहिद आफ्रीदीने कोणत्याही माजी भारतीय क्रिकेटपटूचे नाव न घेता पाकिस्तानवर आरोप लावल्याबद्दल जोरदार टीका केली. तो म्हणाले, "दोन क्रिकेटपटू ज्यांनी भारतासाठी इतके क्रिकेट खेळले आहे. ते राजदूत ठरले आहेत. ते अव्वळ क्रिकेटपटू राहिले आहेत, ते थेट पाकिस्तानला दोषी ठरवतात. भाऊ, का पाकिस्तान? काही पुरावा तरी दाखवा."
'एकाला आम्ही चहा पाजून परतही केले'
शाहिद आफ्रीदीने कुलभूषण जाधव जे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहे आणि अभिनंदन वर्धमान, ज्यांना पाकिस्तानी लष्कराने पकडल्यानंतर भारतात परत पाठवले होते त्यांची उदाहरण दिले. शाहिद आफ्रीदी म्हणाला, "आम्ही तुम्हाला पुरावे दिले आहेत. एक अजूनही आमच्याकडे आहे, एकाला आम्ही चहा पाजून परतही केले. आम्हाला पुरावे दाखवा, आम्हाला विनाकारण दोष देऊ नका."
बलुचिस्तानमधील अशांतीसाठी भारताला जबाबदार ठरवले
शाहिद आफ्रीदीने बलुचिस्तानमधील अशांततेसाठीही भारताला जबाबदार ठरवले. शाहिद आफ्रीदी म्हणाला, "आमच्या देशात काय चालले आहे? बलुचिस्तानात काय चालले आहे? यामागे कोण आहे हे आम्हा सर्वांना माहीत आहे. आम्ही कधीही कोणतेही आरोप केले नाहीत. आम्ही भारत आणि जगाला पुरावे दिले."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.