Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली ते सोलापूर प्रवास महागला, पथकराचे नवे दर लागू

सांगली ते सोलापूर प्रवास महागला, पथकराचे नवे दर लागू
 

सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील पथकरामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंगळवारपासून (दि. १ एप्रिल) ती अंमलात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी तशी घोषणा केली.

रत्नागिरी - नागपूर महामार्ग क्रमांक १६६ वरील बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), अनकढाळ आणि इचगाव (जि. सोलापूर) या तीनही पथकर नाक्यांवर मंगळवारपासून वाढीव दराने पथकर भरावा लागेल. बोरगाव पथकर नाक्यावरील पथकर अन्य दोन नाक्यांच्या तुलनेत जास्त आहे. या नाक्यावरील पथकर ६५.९४४ किलोमीटर अंतरासाठीचा आहे.

बोरगाव नाक्यावरील १ एप्रिलपासूनची करआकारणी अशी : (एकेरी, दुहेरी, मासिक पास) : कार, जीप, प्रवासी व्हॅन, हलक्या मोटारी - १२०, १८०, ३,९६५. हलकी मालवाहू वाहने, मिनी बस - १९०, २९०, ६,३९५. ट्रक, बस - ४००, ६०५, १३,४१०. व्यावसायिक वाहने - ४४०, ६६०, १४,६३५. खोदकाम करणारी यांत्रिकी वाहने - ६३०, ९४५, २१,०२५. सात ॲक्सलपेक्षा मोठी अवजड वाहने - ७७०, १,१५०, २५,५९५.

अनकढाळ नाक्यावरील नवी करआकारणी अशी : एकेरी, दुहेरी, मासिक : कार, जीप, प्रवासी व्हॅन, हलक्या मोटारी - ११०, १६५, ३,७००. हलकी मालवाहू वाहने, मिनी बस - १८०, २७०, ५,९६५. ट्रक, बस - ३७५, ५६५, १२,५१५. व्यावसायिक वाहने - ४१०, ६१५, १३,६६०. खोदकाम करणारी यांत्रिकी वाहने - ५९०, ८८५, १९,६२०. सात ॲक्सलपेक्षा मोठी अवजड वाहने - ७१५, १०७५, २३,८८५. नाक्याच्या टप्प्यातील ६३.०९५ किलोमीटर प्रवासासाठी हा पथकर आहे. सध्याच्या सुधारित पथकराला रस्ता मंत्रालयाने २५ मार्च रोजी मान्यता दिली.
७,८४० कोटी रुपये खर्च

प्राधिकरणाने म्हटले आहे की, सांगली ते सोलापूर महामार्गासाठी ७ हजार ८४० कोटी रुपये खर्च आला आहे. या भांडवली खर्चाच्या वसुलीनंतर पथकर ४० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल.

स्थानिकांना ३५० रुपयांचा पास
पथकर नाक्यापासून २० किलोमीटर परिघाच्या गावांतील स्थानिक बिगर व्यावसायिक वाहनांना महिन्याकाठी ३५० रुपयांचा पास काढावा लागेल. हा पास रद्द करून मोफत प्रवासाची सवलत द्यावी, यासाठी बोरगाव परिसरातील गावे संघर्ष करीत आहेत. पण, त्याबाबत सकारात्मक निर्णय अद्याप झालेला नाही. या महामार्गावर १६ ऑगस्ट २०२२ रोजी पथकर वसुली सुरू झाली, तेव्हापासून प्रत्येक १ एप्रिलला त्यामध्ये वाढ केली जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.