Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरेंद्र मोदींनंतर नवे पंतप्रधान कोण? या तीन बड्या नेत्यांच्या कुंडलीमध्ये आहे खास योग, ज्योतिषांचं मोठं भाकीत

नरेंद्र मोदींनंतर नवे पंतप्रधान कोण? या तीन बड्या नेत्यांच्या कुंडलीमध्ये आहे खास योग, ज्योतिषांचं मोठं भाकीत
 

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असणार? याचं सर्वात मोठं कारण हे देखील आहे की आता नरेंद्र मोदी याचं वय 74 वर्ष झालं आहे. नेत्याचं वय 75 वर्ष झालं की त्याने राजकारणातून निवृत्ती घ्यावी, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहवं असा भाजपनं पक्षांतर्गत नियम बनवल्याचं देखील बोललं जातं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचा कोणता नेता पंतप्रधान बनणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान पदासाठी अनेक नेत्यांचं नाव समोर येत आहे. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार भाजपमध्ये सध्या असे तीन नेते आहेत, जे नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान होऊ शकतात. पंतप्रधान पदासाठी त्यांची ग्रह दशा अनुकूल आहे, असा दावा भविषवेत्त्यांकडून केला जात आहे. कोण आहेत ते तीन नेते? त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

अमित शाह
ज्योतिषांकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार शनि देवाची दशा अमित शाह यांना स्थौर्य मिळून देणारी आहे. अमित शाह यांना काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी या ग्रहस्थितीचा फायदा होणार आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये असलेला गुरूचा प्रभाव त्यांना त्यांच्या राजकीय जीवनात एक मोठी संधी मिळून देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी चर्चा आहे. मीडियामध्ये देखील अमित शाह यांचं नाव चर्चेमध्ये आहे.

योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ हे भविष्यात भारताचे पंतप्रधान होऊ शकता तसा योग त्यांच्या कुंडलीमध्ये असल्याचा दावा ज्योतिषांकडून करण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत हिंदू राष्ट्र होऊ शकतं असा दावा देखील ज्योतिषांनी केला आहे. योगी आदित्यनाथ यांना राजकारणात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र शनि देव आणि मंगळाची जी स्थिती आहे. त्यामुळे ते या संकटांचा सहज सामना करतील असं म्हटलं आहे.

नितीन गडकरी
नितीन गडकरी हे देखील पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असल्याचा दावा ज्योतिषांनी केला आहे. नितीन गडकरी यांच्या कुडंलीमध्ये गुरु हे कर्माच्या दहाव्या भावामध्ये बसलेले आहेत. ज्यामुळे ते राजकारणात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात, त्यांच्या कुंडलीमध्ये पंतप्रधान पदाचा योग दिसून येत आहे, असा दावा ज्योतिषांनी केला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल 'सांगली दर्पण' कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.