सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रिश्टरस्केल तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. साधारणपणे 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले, असे देखील प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. काही दिवसांपूर्वी म्यानमार येथे देखील मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले होते.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, आज ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूरमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर २.६ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदु हा जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता. आधी मंगळवारी (१ एप्रिल) कोलकाता आणि इंफाळमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले होते. २८ मार्च रोजी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के भारतातील बिहार, सिलीगुडी आणि आजूबाजूच्या इतर भागांमध्ये जाणवले होते. २ एप्रिल रोजी सिक्कीममधील नामची येथे भूकंपाचे जाणवले होते. गंगटोकमध्ये सलग दोन दिवस म्हणजे ३० आणि ३१ मार्च रोजी भूकंप आला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.