Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या' भाजीचे सेवन केल्यामुळे रक्ताचा प्रत्येक थेंब होईल डायबिटीज फ्री! रोजच्या आहारात नियमित करा सेवन, शरीर राहील निरोगी

'या' भाजीचे सेवन केल्यामुळे रक्ताचा प्रत्येक थेंब होईल डायबिटीज फ्री! रोजच्या आहारात नियमित करा सेवन, शरीर राहील निरोगी
 

जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. ज्यामुळे बऱ्याचदा शरीरामध्ये इतर आजार होण्याची शक्यता वाढू लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराच्या इतर अवयवांनासुद्धा इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, गोड पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीची जीवनशैली फॉलो न करता शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व पदार्थांचे आहारात नियमित सेवन करावे.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात पथ्य पाळणे अतिशय महत्वाचे आहे. गोड पदार्थांचे कमी सेवन, तिखट आणि तेलकट कमी खाणे, बाहेरील पदार्थांचे सेवन इत्यादी गोष्टी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाजीचे सेवन आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरेल.


रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात कोबी आणि आल्याच्या रसाचे सेवन करावे. उपाशी पोटी या रसाचे नियमित सेवन केल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहिला आणि शरीराला अनेक फायदे होतात. कोबी आल्याचं रस तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेली कोबी आणि आल्याचा तुकडा टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा वाटून घ्या. तयार केलेला एस गाळून सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला पोषण देतात. शरीरात होणारी जळजळ कमी करण्यासाठी आल्याच्या रसाचे सेवन करावे.

मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी कारली वरदान ठरतील. कारल्याचा कडूपणा रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. याशिवाय आहारात कारल्याच्या भाजीचे नियमित सेवन केल्यास शरीर सुधारेल. ही भाजी इन्सुलिन संवेदनशीलता वाढून रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करते. उपाशी पोटी कारल्याचा रस प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होते, याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट, आतड्या स्वच्छ होतात.

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय आवश्यक आहेत. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित काकडी आणि पालकचा रस काढून प्यावा. यामुळे शरीर सुद्धा हायड्रेट आणि कायम निरोगी राहील. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी काकडी पालकच्या रसाचे सेवन करावे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.