Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विश्रामबाग येथील आरक्षित भाजी मंडईच्या जागेवर बाग सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्या बाबत:, तानाजी सावंत

विश्रामबाग येथील आरक्षित भाजी मंडईच्या जागेवर बाग सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्या बाबत:, तानाजी सावंत


प्रति,
मा.आयुक्त सो,
सां.मि.कु.महानगरपालिका, सांगली.
विषय- विश्रामबाग येथील आरक्षित भाजी मंडईच्या जागेवर बाग सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्या बाबत.
संदर्भ- मनपा सांगली यांना दि. ०४/०७/२०२४ रोजी दिलेले निवेदन. 


महोदय,
वरील विषयास अनुसरून ज्ञांनेश्वर चौक, दांडेकर हॉल पाठीमागे, विश्राबाग, सांगली येथील सं.नं.३६५ या क्षेत्रावरती भाजीमंडईचे आरक्षण असताना व त्या ठिकाणी मागील काही वर्षापूर्वी भाजीमंडई मंजूर झाली असताना केवळ महापालिकेचा पैसा लाटण्यासाठी तेथील एका लोकप्रतींनिधीने त्या जागी बाग सुशोभीकरणाची मागणी करून संबंधित अधिकार्‍याच्या संगनमताने सदर कामासाठी ४,६९,८५० रुपये मंजूर करून घेतले व त्या पैशातून विकासाच्या नावाखाली रानवटी झाडे लावून महानगरपालिकेचा पैसा लाटण्यात आला आहे. त्याच बरोबर त्या ठिकाणी अनेक वर्षापूर्वीची जुनी निलगिरीची झाडे बेकायदेशीररित्या तोडून त्यांचा देखील वेव्हार करण्यात आला आहे, सदर बाबीची चौकशी करण्यासाठी व दोषी आढळल्यास कारवाई करण्यासाठी संदर्भीय पत्रानुसार कळवले होते, परंतु त्यावर अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. 
    

 तरी तक्रारी अर्ज / निवेदन  प्राप्त झाल्यापासून शासनाच्या विहित मुदतीमद्धे त्यावर कार्यवाही करणे बंधनकारक असताना ९ महीने होऊन देखील सदर निवेदनावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच संदर्भीय निवेदनाची व 

सदर विषयाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी ही विनंती अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागले याची नोंद घ्यावी. 
टीप- संदर्भीय निवेदन सोबत जोडले आहे.  
                                                                          
कळावे,

तानाजी सावंत..
––––––––––––––

वरील आशयाचे निवेदन मनपा आयुक्त सत्यम गांधी यांना देण्यात आले व भाजी मंडई साठी आरक्षित असलेल्या सं.नं.३६५ जागेची त्यांना माहिती दिली आयुक्तांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर  जागेची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याचे सांगितले तसेच आरक्षित जागी भाजी मंडई उभारण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.