Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यपाल तरी करा, नाही तर आमची अवस्था बँडवाल्यासारखी होईल - सदाभाऊ खोत

राज्यपाल तरी करा, नाही तर आमची अवस्था बँडवाल्यासारखी होईल - सदाभाऊ खोत
 

सांगली : कोणी कितीही देव पाण्यात ठेवू दे, देवा भाऊ एक दिवस गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार. मात्र मला कुठं तरी राज्यपाल तरी करा, नाही तर आपली अवस्था बंद बॅडवाल्यासारखी होईल; अशा मिश्कील शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे.
 

 

सांगलीच्या विटा येथे बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील. असे सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा; अशी मिश्कील भावना व्यक्त केली. त्यामुळे व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
जयंत पाटील सध्या तळ्यात मळ्यात : गोपीचंद पडळकर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर अनेक बडे नेते अजित पवार यांच्यासोबत आले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. तरी देखील अनेकांची घुसमट सुरु आहे. यावरच गोपीचंद पडळकर यांनी भाष्य करताना शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते असलेले जयंतराव पाटील यांचे देखील सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे, अशी मिश्किल टिपणी पडळकर यांनी सांगलीच्या विटामध्ये नागरी सत्कार वेळी बोलताना केली आहे.

जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवायचा
सांगलीच्या विटा येथे भव्य नागरी सत्कार गोपीचंद पडळकर यांचा करण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख आणि भाजपचे नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर मिश्किल टिपणी करत सध्या जयंत पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे; यासाठी तयारीला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.