"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते", असं वक्तव्य मंत्री नीतेश राणेंनी केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांना निशाण्यावर धरलं. राणेंनी केलेल्या दाव्याला छेद देत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपली भूमिका मांडली आहे. "शिवाजी महाराज हे
१०० टक्के सेक्युलर होते", असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट
केलं आहे. तसेच "राजेंनी कधी मशिदीवर हल्ला केलेला नाही", असंही नितीन
गडकरी म्हणाले आहेत.
"राजे १०० टक्के सेक्युलर"
कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर २ इंग्रजी कांदबरी लिहिल्या आहेत. या पुस्तकांचं प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीत पार पडला. या सोहळ्यावेळी नितीन गडकरी म्हणाले, "आजकाल सेक्युलर हा शब्द फार प्रचलित आहे. सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीमध्ये अर्थ धर्मनिरपेक्षता असा होत नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा होतो. म्हणजेच सगळ्या धर्मांसोबत समान न्याय करणे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या इतिहासातील असे राजे होते, जे १०० टक्के सेक्युलर होते", असं नितीन गडकरी म्हणालेत.
"अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी"
"छत्रपती
शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लढया लढल्या आहेत. परंतु,
त्यांनी कधी मशिदीवर हल्ला केलेला नाही. ज्या अफझल खानानं छत्रपती शिवाजी
महाराजांवर वार केले होते, त्याच्यावर देखील महाराजांनी वार केला. त्यावेळी
अफझल खानचा मृत्यू झाला. खानाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी
अफझल खान याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा, असे आदेश दिले होते",
असं नितीन गडकरी म्हणालेत.
"जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही"
"जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही. तर, तो पराक्रमाने मोठा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात काही मुस्लिम सैनिक देखील होते. शिवाजी महाराज यांचं कार्य फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित न राहता, जगभर जायला हवं, अशी अपेक्षाही नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.