माजी गृहमंत्र्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी 28 वर्षाची आहे. तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आपलं जिवन संपवलं आहे. गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तूळातल्या घरांमध्ये काही ना काही अप्रिय घटना घटताना दिसत आहेत. मध्य प्रदेशातही भाजपच्या नेत्याची
हत्या करण्यात आली. तर पंजाबमध्ये ही शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा
प्रमुखाची हत्या झाली. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या जेष्ट नेत्याच्या
सुनेनं आत्महत्या केली होती. या घटनेनं राजकीय वर्तूळात खळबळ उडाली असताना
अजून एक घटना समोर आली आहे.
भृगू कुमार फुकन हे आसामचे माजी मंत्री
आहेत. त्यांनी गृहमंत्री म्हणून काम पाहीलं आहे. 2006 साली त्यांचे निधन
झाले होते. उपासा फुकन ही त्यांची कन्या आहे. तीचं वय 28 वर्ष आहे. उपासा
ही आपल्या गुवाहाटीच्या घारगुल्ली या ठिकाणी असलेल्या घरात होती. रविवारी
सकाळी सात वाजताच्या सुमारास ती घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली. तिथून उडी
घेत तिने आत्महत्या केली. उडी घेतल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिला त्यावेळी मृत घोषीत करण्यात आले. माजी मंत्र्याच्या मुलीने आत्महत्या केल्याने आसाममध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार उपासा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठिक नव्हते. त्यासाठी त्या उपचार घेत होत्या. त्यातूनच हा प्रकार झाला असावा असं बोललं जात आहे.माजी गृहमंत्री भृगु कुमार फुकन यांचं 2006 मध्ये निधन झालं होतं. ते 1985 मध्ये पहिल्यांदा आसाम गण परिषद (AGP) सरकारमध्ये गृहमंत्री होते. आसाम करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक नेते होते.उपासा फुकन ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. भृगू कुमार यांच्या मृत्यूनंतर ती आपल्या आईसह गुवाहाटीच्या घारगुल्ली परिसरातील घरात राहत होती. रविवारी अचानक तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.