सोलापूरमध्ये एका महिलेचे टक्कल करून तिच्या भुवया काढून तिला विद्रुप केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पती, मेहुणा आणि नणंदेने या महिलेसोबत हे धक्कादायक कृत्य केले. त्यांनी केलेल्या या भयानक कृत्यामागचं
कारण समोर आले आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यामध्ये तिघांविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही धाराशिवची आहे. या महिलेचे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झाले होते. पीडित महिलेच्या पतीने तिला मारहाण करत तिचे मुंडन केले आणि तिच्या भुवयांवर ट्रिमर फिरवला होता. असे कृत्य करून नवऱ्याने या महिलेला विद्रुप बनवले. महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी पीडित महिलेसोबत नवऱ्याने हे धक्कादायक कृत्य केले होते. ऐवढ्यावर न थांबता त्याने तिला १५ दिवस घरामध्ये डांबून ठेवले होते. कसं तरी ती महिला तिथून पळून गेली आणि माहेरी गेली. त्यावेळी हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला.
चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून
पीडित महिलेच्या नवऱ्याने हे कृत्य केले. पीडित महिलेने मेहुणा आणि
नणंदेचे अनैतिक संबंध असल्याची माहिती आपल्या नवऱ्याला दिली होती. त्यामुळे
संतप्त झालेल्या तिच्या नवऱ्याने हे कृत्य केले. नवरा, नणंद आणि
मेहुण्याने मुंडन केल्याचा आरोप महिलेने केले आहे. तिघांविरोधात
सोलापूरच्या बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शी पोलिस
या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमुळ सोलापूरमध्ये चर्चा होत आहे.
पीडित महिलेने सांगितले की, 'टॉर्चर करत मी केस कढल्याच बोलून घेत व्हिडिओ काढला. पोलिस ठाण्यात तक्रार करून आरोपींवर कुठलीही कारवाई झाली नाही.' न्याय मिळावा यासाठी पीडित महिला आणि आईची भटकंती सुरू आहे. अद्याप पोलिसांकडून आरोपींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी पीडितेने केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.