मिरज : नवजीवन कॉलनी येथे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू झाला. झीयानअली अस्मान गोलंदाज (वय 13, रा. नवजीवन कॉलनी, खतीबनगर, मिरज) असे त्याचे नाव आहे.
झीयानअली गोलंदाज हा नवजीवन कॉलनी येथील स्कायलाईन अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर खेळण्यासाठी गेला होता. या ठिकाणी तो खेळत असताना त्याचा तोल गेला आणि तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद आहे. अधिक तपास सुरू असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.