Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धर्मादाय रुग्णालय असताना एवढ्या पैशांची मागणी का? रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का?

धर्मादाय रुग्णालय असताना एवढ्या पैशांची मागणी का? रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का?
 

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर वादात आलं आहे. धर्मादाय रुग्णालय असताना रुग्णांकडून एवढ्या पैशांची मागणी का? असा सवाल माहिती अधिकारी कार्यकर्ता विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान यानंतर धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारकडून एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली आहे. पुण्यात तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. दिनानाथ मंगेशकर हे धर्मादाय रुग्णालय आहे. रुग्णालयाला राज्य सरकारकडून देखील सवलती दिल्या जातात. मात्र, तरीही उपचाराआधीच रुग्णांकडे पैशांची मागणी का केली जाते? त्यामुळे रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित करण्यात येत आहे.
- मंगेशकर रुग्णालयाला एका रुपयाच्या लीजवर जागा

- लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून 2001मध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना

- सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलची स्थापना

- उत्तम दर्जाचे उपचार माफक दरात करण्याचं हॉस्पिटलचं उद्दिष्ट

- पुण्यातील एरंवडणे भागात 6 एकरवर हॉस्पिटल उभारलं

- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी धर्मदाय रुग्णालय म्हणून करण्यात आली

- हॉस्पिटलच्या उभारणीसाठी शासनाकडून नाममात्र दराने जमीन देण्यात आली

'धर्मदाय रुग्णालय असतानाही लाखोंची मागणी, घटनेला रुग्णालय, सरकार जबाबदार'
विजय कुंभारे, माहिती अधिकार कार्यकर्ता

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक कमिटी स्थापन केली आहे. ही कमिटी धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करेल. तसंच धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. एकीकडे राज्यभरात खासगी रुग्णालयं रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप होत आहे.. त्यातच आता धर्मदाय रुग्णालयांमध्ये गोर गरिबांकडे उपचारासाठी पैशांचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूणच आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचं चित्र आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.