Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्रीलंकेतील 'या' गुहेत आजही आहे रावणाचा मृतदेह; अंत्यसंस्कार का झाले नाहीत? वाचा...


श्रीलंकेतील 'या' गुहेत आजही आहे रावणाचा मृतदेह; अंत्यसंस्कार का झाले नाहीत? वाचा...
 

रामनवमीचा उत्सव रविवारी (ता. ६) एप्रिलला भारतात साजरा केला जाणार आहे. रामायण हे प्रत्येकाला काही ना काही शिकवते. रामायणाशी संबंधित रहस्ये जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. परंतु तुम्हाला माहित आहे का की, श्रीलंकेत एका गुहेत आजही रावणाचा मृतदेह जपून ठेवलाय. रामायण आणि भगवान रामाशी संबंधित अनेक चिन्हे आणि पुरावे श्रीलंकेत सापडतात.

श्रीलंकेत रामायणाच्या खुणा
एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, सुमारे ५० ठिकाणे अशी आहेत जी रामायणाशी संबंधित आहेत. या संशोधनानुसार, रावणाचा मृतदेह अजूनही एका टेकडीवर बांधलेल्या गुहेत सुरक्षित आहे. ही गुहा श्रीलंकेतील रग्गलाच्या घनदाट जंगलात आहे. असे म्हटले जाते की भगवान श्री राम यांनी रावणाचा वध करून १० हजार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
कुठे आहे रावणाचा मतृदेह?

श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय रामायण संशोधन केंद्राने काही दिवसांपूर्वी एक संशोधन केले. त्यांच्या संशोधनानुसार रावणाचा मृतदेह १८ फूट लांब व ५ फुट रुंद असलेल्या एका पेटीत ठेवण्यात आलेला आहे. ही पेटी एका गुहेत आहे. ती गुहा श्रीलंकेतील रागलाच्या जंगलात ८ हजार फूट उंचीवर आहे. येथे रावणाचा मृतदेह ममी करून शवपेटीत ठेवण्यात आला आहे. त्यावर एक विशेष प्रकारचा लेप लावण्यात आला आहे, ज्यामुळे तो हजारो वर्षांपासून सारखाच दिसतो.

मृतदेहाखाली आहे खजिना
या शवपेटीखाली रावणाचा अमूल्य खजिना आहे, असेही म्हटले जाते. या खजिन्याचे रक्षण एका भयंकर नागाने आणि अनेक धोकादायक प्राण्यांनी केले आहे. असे मानले जाते की, जेव्हा भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला तेव्हा त्यांनी त्याचे शरीर अंत्यसंस्कारासाठी विभीषणाला दिले. पण विभीषणाने सिंहासनावर बसण्याच्या घाईत रावणाचे दहन केले नाही आणि त्याचे शरीर तसेच सोडून दिले.
काय आहे आख्यायिका?

रावणाचा मृत्यू झाल्यावर त्याचे शरीर बिभिषणाकडे दिले. मात्र त्याने ते तेथेच सोडून दिले. त्यानंतर नागकुलाच्या लोकांनी रावणाचा मृतदेह त्यांच्यासोबत नेला. रावणाचा मृत्यू तात्पुरता आहे आणि तो पुन्हा जिवंत होईल, असा विश्वास नागकुलाच्या लोकांना होता. परंतु तसे घडले नाही. रावण जिवंत झाला नाही. परंतु या लोकांना कधी ना कधी रावण जिवंत होईल या आशेवर रावणाचे शरीर ममी स्वरुपात जतन करुन ठेवले. जेणेकरून ते वर्षानुवर्षे सुरक्षित राहील.

अशोक वाटिकेचाही लावला शोध
रावणाची अशोक वाटिका कुठे होती आणि त्याचे पुष्पक विमान कुठे उतरायचे हे देखील शोधून काढण्यात आल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. याशिवाय भगवान हनुमानाच्या पावलांचे ठसेही सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या सर्व गोष्टींची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.