Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तरुण पिढीसाठी हेल्थ इन्श्युरन्सचे महत्त्व- लेखक: भास्कर नेरुरकर,हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स

तरुण पिढीसाठी हेल्थ इन्श्युरन्सचे महत्त्व - लेखक: भास्कर नेरुरकर, हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स
 

आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात, आपली जीवनशैली बदलत्या सामाजिक-गतिशीलतेशी जुळवून घेण्यासाठी सातत्याने विकसित होत आहे. या उत्क्रांतीमुळे तरुण आणि वृद्ध दोन्ही पिढ्यांसाठी आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. त्‍यांचे वय काहीही असो, पण ते हेल्थ इन्श्युरन्सच्या महत्त्वापासून अनभिज्ञ असतात. मधुमेह, हृदयविकाराचा झटका, श्वसनसंक्रमण आणि कर्करोग यासारख्या जीवनशैलीच्या आरोग्याच्या प्रमुख समस्या या महत्त्वपूर्ण आरोग्य समस्या आहेत ज्या आपण वृद्ध लोकांमध्ये पाहत होतो आणि आता तरुण पिढीमध्ये लहान वयातच दिसून येतात. हे सर्व तरुण पिढीसाठी हेल्थ इन्श्युरन्स संरक्षण महत्वाचे बनवते जे निश्चित आर्थिक हमीसह आपल्या भविष्याची स्वप्ने पाहत आहेत आणि नियोजन करीत आहेत. 
 

 
तुम्ही कमी वयात हेल्थ इन्श्युरन्स का निवडावा याविषयी खालील काही घटक पाहूया:
 
1. परवडणारे प्रीमियम: कमी वयात हेल्थ इन्श्युरन्स घेण्‍याचा नेहमीच सल्ला दिला जातो. याचे कारण म्‍हणजे तरुणांना आजार होण्याची शक्यता कमी असते आणि अपघाती जोखीम जास्‍त असते. तुलनेने कमी प्रीमियमसह व्यापक कव्हरेज निवडण्याचा लाभ तरुण वयात मिळतो. त्यामुळे, जितक्‍या लवकर तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स निवडाल, तितक्‍या कमी प्रीमियममध्‍ये तुमच्या हेल्थ इन्श्युरन्सद्वारे अधिक आर्थिक संरक्षण मिळू शकते.

 
2. प्रतीक्षा कालावधी:
जेव्हा तुम्ही तरुण असता, तेव्हा तुम्ही गंभीर रोगांसाठी कमी संवेदनशील असू शकता, ज्यामुळे सामान्यपणे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीशी संबंधित प्रतीक्षा कालावधीदरम्यान तुम्हाला फायदा होतो. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी, प्रतीक्षा कालावधी सामान्यपणे पॉलिसी कालावधी सुरू झाल्यापासून 30 दिवस असतो. याचा अर्थ असा की इन्श्युअर्डला प्रारंभिक प्रतीक्षा कालावधीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे ज्यादरम्यान केवळ अपघाती दुखापतीचा दावा स्वीकारला जाऊ शकतो.
तुम्ही जितके तरुण असाल, त्‍यानुसार दावा दाखल न करता प्रतीक्षा कालावधी पार करणे सोपे आहे. दुसऱ्या बाजूला, जसजसे तुमचे वय वाढत असते, तुम्हाला आरोग्याच्या समस्यांची शक्यता अधिक असते आणि या प्रतीक्षा कालावधीदरम्यान दावा दाखल करण्यास असमर्थ असू शकता. याव्यतिरिक्त, अनेक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह आणि इतर विशिष्ट रोगांसाठी दीर्घ प्रतीक्षा कालावधी देखील आहे. 

अशा रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी अनेकदा जास्त असतो कारण त्यांना पूर्व-विद्यमान किंवा उच्च-जोखीम स्थिती मानली जाते आणि शरीरात स्थिर होण्यास वेळ लागतो. हे मॅटर्निटी कव्हरेज सारख्या इतर कव्हरेजसाठी प्रतीक्षा कालावधीवर देखील लागू होते. त्यामुळे, तरुण वयात हेल्थ इन्श्युरन्स मिळवणे तुम्हाला हे विशिष्ट प्रतीक्षा कालावधी लवकर पूर्ण करण्याची परवानगी देते. याचा अर्थ असा की तुम्ही लग्‍न करण्याचा प्लॅन करत असाल किंवा जेव्‍हा तुम्हाला कोणतेही मोठे आजार झाले असतील तेव्‍हा हा प्रतीक्षा कालावधी यापूर्वीच संपला असेल. परिणामी, दुर्दैवाने, भविष्यात तुमच्या पॉलिसी कालावधीदरम्यान अशा घटना घडल्यास तुम्ही अशा रोगांसाठी दावा दाखल करू शकता.

3. पॉलिसीपूर्व वैद्यकीय तपासणी नाही: तरुण वयात हेल्थ इन्श्युरन्स मिळवण्याची शिफारस केली जाते कारण वैद्यकीय रेकॉर्डची सकारात्मक घोषणा नसल्यास तुम्हाला प्री-मेडिकल चेक-अप करण्याची गरज नसते. जसजसे तुमचे वय वाढते, तसतसे तुम्हाला प्रथम प्री-मेडिकल चेक-अपची आवश्यकता असू शकते, ज्याच्या आधारावर तुमच्या प्रस्तावाची स्वीकृती निर्धारित केली जाऊ शकते. हेल्थ इन्श्युरन्ससह, तुम्ही नियमित तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय करू शकता. हा सक्रिय दृष्टीकोन तुम्हाला कोणत्याही संभाव्य आरोग्य समस्या लवकरात लवकर ओळखण्यास आणि नंतर त्यांना प्रमुख आरोग्य समस्या बनण्यापासून रोखण्यास मदत करतो.
 
4. संचयी बोनस: अनेक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स प्रत्येक दावा-मुक्त वर्षासाठी संचयी बोनस ऑफर करतात. हा बोनस तुम्‍हाला अतिरिक्त शुल्काशिवाय तुमची सम इन्श्युअर्ड स्वयं-वाढविण्याची परवानगी देतो. तरुण लोक सामान्यपणे निरोगी असतात आणि पॉलिसी वर्षादरम्यान दावा करण्याची आवश्यकता नसते, ज्यामुळे त्यांना कालांतराने हा बोनस जमा करणे सोपे होते. वयोवृद्ध लोकांना वयाशी संबंधित वैद्यकीय स्थिती असू शकतात ज्यामुळे दावे दाखल करावे लागू शकतात, ज्यामुळे त्यांना संचयी बोनस मिळविणे आव्हानात्मक ठरते.

5. वाढता खर्च कमी करण्यास मदत होते: भारतातील आरोग्यसेवा अधिक महाग होत आहे आणि आरोग्यविषयक खर्चाच्या महागाईमुळे आणखीच वाढत आहे. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार यांसारख्या आरोग्यविषयक समस्याही तरुण पिढीत वाढत असून, त्याचे मुख्य कारण त्यांच्या जीवनशैलीतील बदल आहे, ज्याच्या परिणामी आरोग्यसेवेच्या एकूण खर्चातही वाढ होत आहे. या आजारांच्या उपचारासाठी मोठा खर्च येऊ शकतो, त्यामुळे तरुण पिढी आणि त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक बोजा पडू शकतो. म्हणूनच कमी वयात हेल्थ इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे कारण हेल्थ इन्श्युरन्स एका आर्थिक सहाय्य प्रणालीसारखा आहे जो तुम्हाला अशा उच्च वैद्यकीय खर्चापासून संरक्षित करण्यास मदत करतो. हा आर्थिक बॅक-अप प्लॅन असण्यासारखा आहे जो वैद्यकीय आवश्यकतेच्या बाबतीत तुम्ही आर्थिकदृष्ट्या संरक्षित असल्याची खात्री करतो.
 
हेल्थ इन्श्युरन्स निवडताना, तुम्हाला काय आवश्यक आहे याचा विचार करा. जर तुम्ही तरुण असाल तर विविध हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स तपासा, ते कोणते कव्हरेज ऑफर करतात ते पाहा, इन्श्युररवर त्यांचे नेटवर्क हॉस्पिटल्स जाणून घेण्यासह मोठ्या प्रमाणात संशोधन करा आणि तुमच्या कुटुंबाच्या रेकॉर्डची जाणीव ठेवून तुमच्या आवश्यकतेनुसार सर्वोत्तम असलेली पॉलिसी निवडा. कोणत्याही आरोग्य समस्यांपूर्वी हेल्थ इन्श्युरन्स असणे शहाणपणाचे आहे कारण ते तुम्हाला अधिक कव्हरेज देते आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवते. यामुळे तरुण पिढीला आपले आरोग्य आणि आर्थिक सुबत्ता जपली जाते, हे जाणून आत्मविश्वासाने जीवनातील अनिश्चिततेला सामोरे जाता येते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.