मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार, तर दोषी कसं होणार? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीवर मंत्री हसन मुश्रीफांची चपराक
पुण्यातील मस्तवाल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने पैशांअभावी उपचार नाकारल्याने भाजप आमदाराच्या पीएच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाजप नेत्याने
फोन केल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने महिला आणि तिच्या कुटुंबीयांचे ऐकले
नाही. राज्यभर रुग्णालयाविरोधात आक्रोश सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मादाय
आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयाबाबत कठोर पावले उचलली जातील, असे
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना देखील ते लागू करत नाहीत
दरम्यान,
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल
प्रशासनाला चपराक लगावली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाजप नेत्याने फोन
केल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने महिला आणि तिच्या कुटुंबीयांचे ऐकले
नाही. राज्यभर रुग्णालयाविरोधात आक्रोश सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मादाय
आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयाबाबत कठोर पावले उचलली जातील, असे
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना देखील ते लागू करत नाहीत
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला चपराक लगावली आहे. धर्मादाय आयुक्त खाली रजिस्टर असलेल्या हॉस्पिटल्सना शासनाची सवलत असून त्यांना कोणताही टॅक्स नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.असं असताना देखील ते गरिबांची सेवा करत नाहीत म्हणून अशा पद्धतीचा रोष या हॉस्पिटल्स विरोधात वाढत आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना देखील ते लागू करत नाहीत. माझी विनंती आहे त्यांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करून घ्यावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत, असे ते म्हणाले.
मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार?
हसन
मुश्रीफ म्हणाले की, मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार तर दोषी कसं
होणार? अशा शब्दात हॉस्पिटलच्या समितीला चपराक लगावली. त्या महिलेला दाखल
करून उपचार केले असते तर काय झालं असतं? त्यांनी मानवी भूमिकेतून बघणं
आवश्यक आहे. मुंबईतील कोणत्याही दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत जीवनदायी
योजना नाही, अशी धक्कादायक माहिती सुद्धा त्यांनी दिली.
आर्थिक परिस्थिती बघता आता कर्जमाफी शक्य नाही
दरम्यान, स्वत:ला दोन वर्षांची शिक्षा झाली असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वक्तव्य करत वाद वाढवला आहे. या संदर्भात विचारले असता यांची प्रतिक्रिया मी ऐकली नसल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. मात्र, अजितदादा याबाबत बोलले आहेत. हा सिझन आणि त्याच्या पुढचा सीजन आमची आर्थिक परिस्थिती बघता आता कर्जमाफी शक्य नाही, पण त्यांनी कायमची कर्जमाफी करणार नाही असं म्हटलेलं नाही. आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षांमध्ये आमची नक्की सुधारणार, सगळ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.