जत : रेवनाळ (ता. जत) येथे किरकोळ कारणावरून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रुक्मिणी विलास खांडेकर (वय 35) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पती विलास विठोबा खांडेकर (वय 42, रा. रेवनाळ, ता. जत) असे
संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद विलास बापू सरगर (रा. कोळे) यांनी जत
पोलिसात दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा संशयित
विलास खांडेकर यांच्यावर केला आहे.
पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. विलास हा दारू प्यायल्यानंतर पत्नी रुक्मिणी यांना 'तुझ्या माहेरचे लोक माझ्या घरी का येतात, त्यांना घर नाही का' असं म्हणत शिवीगाळ केली. यावरून दोघांच्यात वाद झाला होता. पती विलास याने 'तुला जिवंत ठेवत नाही', अशी धमकी दिली. मंगळवारी रात्री विलासने त्यांच्या रुक्मिणीच्या डोक्यात वरवंटा घातला. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
दारू का पिता, एवढेच विचारले होते तिने...
संशयित विलास खांडेकर हा वारंवार दारू पिऊन येत होता. त्यानंतर त्यांच्यात वाद होत असे. मंगळवारी रुक्मिणी यांनी विलासला तुम्ही दारू का पिता एवढेच विचारले होते. याचा राग येऊन विलासने मध्यरात्री पत्नी झोपेत असताना वरवंटा डोक्यात घातला. डोक्यातून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाला. उपचारावेळी रुक्मिणीचा मृत्यू झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.