Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशातील पहिला 'फॉरेस्ट वॉक वे' अखेर मुंबईकरांसाठी खुला, तिकीट आणि वेळ जाणून घ्या; एकावेळी फक्त...

देशातील पहिला 'फॉरेस्ट वॉक वे' अखेर मुंबईकरांसाठी खुला, तिकीट आणि वेळ जाणून घ्या; एकावेळी फक्त...
 

मुंबईतील मलबार हिलच्या हिरवळीत वसलेले एक नव इको-टुरिझम आकर्षण म्हणजे एलिव्हेटेड नेचर ट्रेल हे गुढी पाडव्याला सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत हा खुला करण्यात आला असून मलबार हिल येथे तयार करण्यात आलेला नेचर वॉक वेला 'निसर्ग उन्नत मार्ग' असे नाव देण्यात आले आहे.
 

 
470 मिटर लांबीच्या वॉक वेवर चालताना मुंबईच्या मलबार हिल इथे असलेल्या जंगलाचा विविध झाडे, वनस्पती, पक्षी प्राणी यांचा आनंद घेता येणार आहे. या पुलामुळे मुंबईच्या पर्यटनात आणखी एका पर्यटन स्थळाची भर होणार आहे. निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी 'सी व्हिविंग डेक' देखील बांधण्यात आला आ पण या फॉरेस्ट वॉकवेसाठी किती रुपये तिकीट आहे आणि एकाचवेळी किती जण या वॉकवे वर जाऊ शकतात हे जाणून घेऊया.


फॉरेस्ट वॉकवेसाठी भारतीय नागरिकांसाठी प्रवेश शुल्क ₹25 आहे, तर विदेशी पर्यटकांसाठी ते ₹100 आहे. या वॉकवे वर सुरक्षेच्या अनुषंगाने विशिष्ट अशी सीसीटीव्ही नियंत्रण सिस्टम बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गावर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे. तसेच अग्निशामक यंत्रणा आणि फायर अलार्म सिस्टम ही या वॉक वे वर लावण्यात आलेली आहे या सोबतच एक आपत्कालीन एग्जिट ही असणार आहे. ऑनलाइन तिकीट नोंदणीतील बारकोडवर प्रवेश आणि निर्गमसाठीचा पर्याय दिला आहे.


'निसर्ग' मार्गावर एकावेळी 200 व्यक्तींना प्रवेश

निसर्ग उन्नत मार्ग दररोज पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार असून, येथे जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एकावेळी 200 व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी देखील याठिकाणी मिळणार आहे. वनस्पतींमध्ये गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती शिरीष आदी प्रजातींचा समावेश आहे. पक्ष्यांमध्ये कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा / पोपट, हळद्या, नाचण/नाचरा/नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली आदी पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सरडा, झाडसरडे, भारतीय सुळेदार सरडा, नाग, अजगर, नानेटी आदींचा समावेश आहे.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.