'आंबेडकरांच्या सर्व पुतळ्यांची तोडफोड करणार'; खलिस्तान समर्थक दहशतवादी गुर्पतवंत पन्नू याचे वादग्रस्त विधान
प्रतिबंधित दहशतवादी संघटवना शीख फॉर जस्टिसचा सर्वात मोठा नेता गुरपतवंत सिंह पन्नू याने आता डॉ. बाबासाहेब आंबेडकराविरोधात मोहिम सुरु केली आहे. पंजाबमधील जालंधर येथे फिल्लौर येथे
घडलेल्या घटनेनंतर राज्यभर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. नांगेल
गावात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. पन्नूने त्याचा
व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. दहशतवादी गटाने आंबेडकरांच्या पुतळ्यावर
‘खलिस्तान जिंदाबाद’ लिहिले. एसएफजेच्या या दलितविरोधी कृत्यामुळे दलितांनी
आक्रमक पवित्रा घेतला आहे. फिल्लौर पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई
केली नाही.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ खलिस्तानी
ध्वज फडकवण्यात आला आणि त्यावर ‘शीख हिंदू नाहीत’, ‘खलिस्तान जिंदाबाद’
आणि ‘एसएफजे जिंदाबाद’ अशा प्रक्षोभक घोषणा लिहिण्यात आल्या. तसेच पन्नूने
प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत १४ एप्रिल रोजी राज्यभरातील बाबासाहेब
आंबेडकरांचे पुतळे हटवण्याची घोषणा केली आहे. यामागे त्यांनी असा युक्तीवाद
केला की, भारताच्या संविधानामुळेच या देशात शिखांना कोणतेही अधिकार मिळाले
नाहीत. खलिस्तानवादी दहशतवादी पन्नू अनेकदा असे प्रक्षोभक व्हिडिओ
प्रसिद्ध केले आहेत.
अलिकडेच एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये
तो बुलेटप्रूफ जॅकेट घालून जिममध्ये व्यायाम करताना दिसत होता. तो सध्या
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहतो. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पन्नूच्या
हत्येचा आरोप एका माजी भारतीय गुप्तचर एजंटवर केला होता. तेव्हापासून पन्नू
घाबरला आहे आणि बाहेर येत नाही, असे म्हटले जात आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी
दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येपासून तो भीतीच्या वातावरणात जगत
आहे.
पन्नूच्या व्हिडिओचे लोकेशन ट्रेस केले जात असून माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ही अशी पहिलीच घटना नाही. या वर्षी जानेवारीमध्ये अमृतसरमध्ये बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. यावरून बरेच राजकारण झाले. तथापि, ज्याने हे कृत्य केले तो दलित असल्याचे निष्पन्न झाले. आकाशदीप सिंग नावाच्या एका व्यक्तीचा व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये तो पुतळ्यावर चढून हातोड्याने तोडफोड करताना दिसतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि एफआयआर नोंदवला.सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावर असलेल्या शहरात ही घटना घडली असल्याने या घटनेवर खूप गोंधळ उडाला. तिथून सुवर्ण मंदिराचे अंतर जास्त नाही. अमृतसरमधील डॉ. आंबेडकरांचा हा सर्वात उंच पुतळा होता. या घटनेवरून भाजपाने सत्ताधारी ‘आप’वर निशाणा साधला होता. अरविंद केजरीवाल यांच्या परवानगीशिवाय अशी घटना शक्य नाही, असे भाजपाने म्हटले होते. यापूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करून संसदेत अमित शाह यांना कोंडीत पकडले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.