Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कार्यकर्ते पळाले; कोणी गमछा भिरकवला तर कुणी झाडू उगारला, अजित दादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला

कार्यकर्ते पळाले; कोणी गमछा भिरकवला तर कुणी झाडू उगारला, अजित दादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला


रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने एकच धांदल उडाली. संगमेश्वर येथे मशमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अजित पवारांच्या ताफ्यातील अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.

अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे अजित पवार मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावले. संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हा हल्ला केला.


मधमांशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे ताफ्यातील अनेकांची पळापळ झाली, काहींनी तोंड झाकण्यासाठी गमछा, उपरणे वापलरल्याचं दिसून आलं. मधमांशांचा घोंगाट उठताच गाडीत बसण्यासाठी सर्वांची एकच धावपळ झाली होती. काहींनी हाताने मधमाशांना झटकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मधमाशांच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून त्यात मधमाशाही पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक विधान केलंय. '१५ वर्ष काँग्रेसबरोबर काम करत असताना आपण लोकसभा, विधानसभा एकत्रित लढवायचो. पण बाकीच्या निवडणूका जिल्ह्याचे नेतेगण ठरवायचे, काय केलं पाहिजे? तशा पद्धतीने आपण पण मुभा देणार आहोत. सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्यामुळे तुमचा गैरसमज करून घेऊ नका,' कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी हे विधान केलंय

'अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात, की या योजनेचे पैसे आता सरकार थांबवणार, त्यांची गरज आता संपली आहे, गरज सरो वैद्य मरो, अशा चर्चा करत असतात. मी असं करणार नाही, राष्ट्रवादी पक्षाची ती भूमिका नाही. संपूर्ण महायुतीची तशी भूमिका नाही. मुख्यमंत्री किंवा शिंदे साहेबांची ती भूमिका नाही.'


'आम्ही तुम्हाला दिलेली ही भाऊबीज आणि रक्षाबंधनाची भेट आहे. त्यामुळे ही योजना चालूच राहील. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, अशांकरिता ही योजना आहे. एका योजनेचा लाभ मिळत असेल, तर या योजनेचा लाभ मिळणार नाही', असंही अजित पवार यांनी स्पष्ट यावेळी केलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.