काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सांगली
काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली आणि भ्याड हल्ल्याचा निषेध...
अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देण्याची हिच वेळ... ----पृथ्वीराज पाटील
सांगली दि.२३: मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या बेछूट गोळीबारात तीस निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले व दहा नागरिक जखमी झाले आहेत. पहलगाम येथे झालेल्या या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या दुर्दैवी घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांच्या व आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. काश्मिरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,अतिरेक्यांना धर्म नसतो. "दहशतवाद्यांना केंद्राने जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे सर्व धर्मीय लोक एकमेकांना उपयोगी पडतात. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना केंद्र व काश्मीर राज्य सरकारने भरीव मदत व दिलासा दिला पाहिजे. तसेच भारताच्या सीमेवर असलेल्या सर्व पर्यटन स्थळाची पुन्हा पाहणी करून त्याठिकाणी पर्यटाकाच्या सुरक्षेची व्यवस्था करावी.
केंद्र शासनाने अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि दहशतवादमुक्त भारत करावा अशी मागणीही पृथ्वीराज यांनी केली केली. अय्याज नायकवडी म्हणाले, भारतात अतिरेक्यांचा बंदोबस्त ही केंद्राची वल्गणा फोल ठरली आहे. निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालून ठार करणे यात कसली मर्दुमकी? या भ्याड हल्ल्याचा सर्व पक्ष व संघटनांनी जाहीर निषेध केला पाहिजे.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, अय्याजभाई नायकवडी, अजिजभाई मेस्त्री,प्रा. एन.डी.बिरनाळे, बिपीन कदम, अल्ताफ पेंढारी, मयूर पाटील, वसीम रोहिले, योगेश जाधव, विश्वास माने, सचिन चव्हाण, उत्तम सुर्यवंशी, रविंद्र वळवडे, अजित ढोले, तौफिक शिकलगार, विजय आवळे, अफजल बुजरूक, सागर मुळे, शितल सदलगे, रहीम हाटीवाले, प्रशांत गवळी, अनिल मोहिते, श्रीधर बारटक्के, मौला वंटमुरे, पैगंबर शेख, आयुब निशाणदार, आशिष चौधरी, राजेंद्र कांबळे, मीना शिंदे, प्रशांत अहिवळे, विश्वास यादव, रमीज शेख, विकास देसाई खानापूर, माजीद आवटी, गालिब मुल्ला, अभय मोरकाने, प्रथमेश शेटे, दिक्षितकुमार भगत, सुरेश वडर, श्रीकांत साठे, अजित भांबुरे, आदिनाथ मगदूम, आणि जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.