Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पतीला मोठ्या वहिनीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले; पत्नीने मुलांसह जीवन संपविले...

पतीला मोठ्या वहिनीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले; पत्नीने मुलांसह जीवन संपविले...



पतीचे त्याच्या मोठ्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. दुपारच्या सुमारास पत्नीने पतीला त्याच्या वहिनीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. यामुळे तिने वरच्या मजल्यावर जाऊन गळफास लाऊन घेत मुलांसह आत्महत्या केली. नोएडामधील एका महिलेच्या तिच्या मुलांसोबतच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. याबाबत तपास करत असताना तिचा पती आणि वहिनीचे अनैतिक संबंध समोर आले आहेत. पोलिसांनी पती राजकुमार आणि त्याची वहिनी सावित्रीला अटक केली आहे.

 
हैबतपूर भागात आरती (३२), तिची ६ वर्षांची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा यांचा टेरेसवर रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविले होते. परंतू, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर तपासाची सूत्रे फिरली. आरती हिने २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी येथे राजकुमार (३५) याच्याशी लग्न केले होते. 


हे त्याचे दुसरे लग्न होते. राजकुमार याचे तिच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. आरतीला याची माहिती झाल्यावर तिने त्याला विचारणा केली होती. यानंतर तो तिला छोट्या छोट्या कारणावरून मारहाण करू लागला होता. मागील गुरुवारी राजकुमार आणि त्याची वहिनी सावित्री शरीरसंबंध ठेवत होते. तेव्हा आरतीने ते पाहिले आणि त्यांना हटकले. पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने तिच्या मुलांसह आत्महत्या करण्यास सांगितले. यावरून आरती मुलांना घेऊन टेरेसवर गेली आणि तिने रेलिंगला दोर बांधून मुलांना लटकवत स्वतः ही गळफास घेत आत्महत्या केली. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.