Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जमीन घोटाळ्यात AI इमेज रि-शेअर करणाऱ्या IAS अधिकाऱ्याची बदली

जमीन घोटाळ्यात AI इमेज रि-शेअर करणाऱ्या IAS अधिकाऱ्याची बदली


हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीजवळील 400 एकर जमिनीवरील झाडे तोडल्याबद्दल AI च्या मदतीने बनवलेली घिबली इमेज सोशल मीडियावर रि-शेअर केल्याबद्दल पोलिसांनी अलिकडेच समन्स बजावलेल्या वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी स्मिता सभरवाल यांची बदली करण्यात आली आहे.

रविवारी तेलंगणा सरकारने बदली केलेल्या 20 अधिकाऱ्यांमध्ये स्मिता सभरवाल यांच्या नावाचा समावेश आहे.

आठवड्यापूर्वी सायबराबाद पोलिसांसमोर हजर झालेल्या सभरवाल यांनी 'selective targeting' म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 2001 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या सभरवाल यांनी विचारले होते की, हीच पोस्ट पुन्हा शेअर करणाऱ्या 2000 व्यक्तींविरुद्ध अशीच कारवाई करण्यात आली आहे का?

सभरवाल या सध्या युवा प्रगती, पर्यटन आणि संस्कृती (YAT&C) च्या विशेष मुख्य सचिव आणि पुरातत्व संचालक म्हणून काम पाहात होत्या. आता तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये YAT&C मध्ये बदली होण्यापूर्वी त्या या पदावर होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या सचिव म्हणून काम पाहणाऱ्या सभरवाल या मागील BRS सरकारमध्ये एक प्रबळ अधिकारी होत्या. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर, त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून (CMO) बाहेर काढून तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

सभरवाल यांच्यासह 20 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.