जागतिक स्तरावर कार्यरत असणाऱ्या अनेक संस्था विविध मुद्द्यांना अनुसरून काही निरीक्षणं करत त्यासंदर्भातील अहवाल वेळोवेळी सादर करत असतात. अशाच एका अहवालानं भारताचंही लक्ष वेधलं आहे. जिथं, देशातील मुस्लीम लोकसंख्येच्या वाढत्या आकड्याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. अमेरिकेतील रिसर्च फर्म Pew Research साधारण दशकभरापूर्वी म्हणजेच 2015 मध्ये सादर केलेल्या अशाच एका अहवालाचा सध्या संदर्भ दिला जात आहे.
Pew Research नुसार 2050 पर्यंत भारतात मुस्लीम लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक असेल असं सांगण्यात आलं होतं. अहवालानुसार 2050 पर्यंत भारतातील एकूण लोकसंख्या 166 कोटी इतकी असून, यामध्ये हिंदूंची लोकसंख्या 1.3 अब्ज तर, मुस्लीम लोकसंख्या 31 कोटींपर्यंत पोहोचू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे जगभरातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचंही नाव पुढे असून लोकसंख्येतील 11 टक्के भाग हा भारतानंच व्यापल्याचं सांगण्यात येतं. सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या इंडोनेशियामध्ये असली तरीही Pew Research नुसार 2050 पर्यंत भारत या देशाला बराच मागे टाकेल म्हणजेच देशात सरासरी मुस्लीम लोकसंख्या 7 पटींनी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दशकभरात झपाट्यानं वाढली लोकसंख्या...
2001
ते 2011 या दशकभराच्या काळात भारतातील एकूण लोकसंख्या झपाट्यानं वाढली
असून, ही वाढ सरासरी 17.7 टक्के वेगानं झाल्याचं अहवालातून स्पष्ट करण्यात
आलं. यामध्ये मुस्लीम लोकसंख्या 25 टक्क्यांनी तर, हिंदू लोकसंख्या 17
टक्क्यांनी वाढली. 1951 पासून 2011 पर्यंत देशात मुस्लीम लोकसंख्या 386
टक्क्यांनी वाढून हा आकडा 3.54कोटींवरून थेट 17.22 कोटींवर पोहोचलाय तर,
हिंदू लोकसंख्या तुलनेनं कमी म्हणजेच 218 टक्क्यांनी वाढली. आकडेवारीनुसार
ही वाढ 30.35 कोटींवरून 96.62 कोटींवर पोहोचली. यामागोमाग शीख लोकसंख्येत
235 आणि ख्रिस्त लोकसंख्येत 232 टक्क्यांनी वाढ झाली.
लोकसंख्या वाढ आणि प्रजनन दराचं गणित
वृद्धिदराचा आढावा घ्यायचा झाल्यास यामध्ये मुस्लीम लोकसंख्येचा आकडा मोठा असल्याचं स्पष्ट होतं. मात्र लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे घटलेला जन्मदर. 1992 ते 93 दरम्यान हिंदू महिलांचा प्रजनन दर 3.3 इतका होता. तर, मुस्लीम महिलांचा प्रजनन दर 4.4 इतका होता. 2022 मध्ये हिंदू महिलांमध्ये हाच प्रजनन दर 1.9 वर पोहोचला तर मुस्लीम महिलांमध्ये प्रजनन दराचे आकडे 2.3 वर स्थिरावले. मागील 30 वर्षांचा आढावा घ्यायचा झाल्यास मुस्लीम महिलांमध्ये प्रजनन दर 47 टक्क्यांनी घटला असून, हिंदू महिलांमध्ये हे प्रमाण 42 टक्क्यांनी घटल्याचं लक्षात येतं. जागतिक स्तरावर मुस्लीम लोकसंख्येचा आढावा घेतल्यास ही लोकसंख्या 800 कोटींपर्यंत पोहोचते. जगातील साधारण 57 देशांमधील नागरिक इस्लाम धर्माचं पालन करतात असं अहवाल सांगतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.