मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा अद्याप थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये रुसा प्रकल्प संचालक राजेंद्र
भारुड यांची मुंबईतील उद्योग संचलनालयात अतिरिक्त विकास आयुक्तपदी बदली
करण्यात आली आहे. तर वरिष्ठ आयएएस अधिकारी निधी पांडे यांची लघुउद्योग
खात्याच्या व्यवस्थापक संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
भारत बास्टेवाड यांची नागपूरमध्ये
रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर लक्ष्मी नारायण
मिश्रा यांची एमएसआरडीसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखर यांची पालघरच्या
जिल्हाधिकारीपदी तर नेहा भोसले यांची रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
: - राजेंद्र भारुडांची पुन्हा बदली
डॉ.
राजेंद्र भारुड यांची फेब्रुवारी महिन्यात TRTI च्या आयुक्तपदावरून
रुसामध्ये प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर काहीच
दिवसांमध्ये त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे
उद्योग विभागाच्या अतिरिक्त विकास आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?
1. इंदुराणी जाखर - पालघर जिल्हाधिकारी2. नेहा भोसले - रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी3. भारत बास्टेवाड - रोजगार हमी योजना, नागपूर4. राजेंद्र भारूड - अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग5. लक्ष्मी नारायण मिश्रा - जॉईन्ट एमडी, एमएसआरडीसी6. निधी पांडे - व्यवस्थापक संचालक, लघुउद्योग7. वैष्णवी बी - अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपागेल्याच आठवड्यात राज्यातील पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या खालीलप्रमाणे,1. बी.एच. पालवे (आयएएस: एससीएस: 2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.2. मनोज रानडे (आयएएस: एससीएस: 2024) संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांना जिल्हा परिषद, पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.3. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: 2019) महानगरपालिका आयुक्त, सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.4. अंजली रमेश. (आयएएस: आरआर: 2020) संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.5. झेनिथ चंद्र देवंथुला (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.