Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोन्याचा दर 56000 रुपये तोळा होण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण

सोन्याचा दर 56000 रुपये तोळा होण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण
 
 
गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात प्रचंड तेजी दिसून येत आहे. सोन्याचा भाव सध्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे सोने खरेदीसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. शेअर बाजारातील घसरणीमुळे सुद्धा गुंतवणुकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. परिणामी सोन्याच्या दरात आणखी तेजी दिसून येत आहे. पण आता सर्वसामान्यांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
 

 
 
सोन्याचे दर गडगडणार
येत्या काही वर्षांत सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोन्याच्या दरात तब्बल 38 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकन फायनान्शिय सर्व्हिसेस फर्म मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते, सोन्याचा दर प्रति औंस 1820 डॉलरपर्यंत घसरु शकतात. सध्याच्या उच्चांकी दरापासून हा दर 38 टक्क्यांनी खाली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 38 टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. या संदर्भात मनी कंट्रोलने वृत्त दिलं आहे. सोन्याच्या दरात इतकी मोठी घसरण झाली तर भारतात सोन्याचा दर प्रति तोळा 55496 रुपये इतका होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला आजच्या किमतीच्या तुलनेत तब्बल 36 ते 37 हजार रुपयांनी स्वस्तात सोने खरेदीची संधी मिळू शकते.

 
का वाढताय सोन्याच्या किमती?
सोन्याचा सध्याचा दर 3080 डॉलर प्रति ओंसवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमागे अनेक कारणे आहेत. भू-राजकीय तणाव, अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल अनिश्चितता, वाढत्या महागाईची भीती, शेअर बाजारातील घसरणीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी तसेच जगातील प्रमुख देशांकडून सुरू असेलेली सोने खरेदी अशी विविध कारणे सोन्याच्या दरवाढीमागे आहेत.

या कारणांमुळे सोन्यात घसरण होऊ शकते

सोन्यात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे अनेक देशांत सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे. अनेक देश मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्पादन वाढवत आहेत. याशिवाय, जुन्या सोन्याचेही मोठ्या प्रमाणात पुनर्वापर केले जात आहे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या सोन्याचे प्रमाण आणखी वाढत आहे. पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे किमतींवर दबाव वाढेल आणि सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे.
सोन्यात घसरण होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे गेल्या काही तिमाहीत अनेक केंद्रीय बँका आणि गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. पण ही खरेदी जास्त काळ सुरू राहील असे नाहीये.

खरंच इतकी मोठी घसरण होईल का?
विश्लेषक जॉन मिल्स यांनी सोन्याच्या दरात 38 टक्क्यांनी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पण अनेक मोठ्या विश्लेषकांच्या मते, असे होणे थोडे अवघड दिसत आहे. वॉल स्ट्रीटवरील अनेक विश्लेषकांच्या मते, सोन्याच्या दरात घसरण नाही तर उलट सोन्याच्या दरात येत्या काळात आणखी तेजी दिसण्याची शक्यता आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.