राजू शेट्टींची अजितदादांवर जहरी टीका; म्हणाले, '16 मिनिटे एसी बंद पडल्याचा गड्याला एवढा राग का?, लाज वाटली पाहिजे तुम्हाला....'
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी विमानतळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात अवघ्या सोळा मिनिटांत गेले होते. मात्र त्यावेळी सरकारी गाडीचा एसी बंद पडला होता. गड्याला त्याचा राग आला आणि कलेक्टरला म्हणाले, 'प्रोटोकॉल बाजूला ठेवून,
नवीन गाडी घ्या.' सोळा मिनिटे एसी मिळाला नाही; म्हणून उकाड्याने हैराण
झालेला माणूस प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतो.
अरे दिवसाढवळ्या एकाच दोरीला गळफास घेऊन बाप-लेक मरायला लागलेत, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, भीती घालायला सुरुवात करा, त्याशिवाय
तुमचा कर्जमाफीचा प्रश्र सुटणार नाही. पण, तुम्ही काय भीती घालायला तयारच
नाही. मग कसं व्हावं. अजित पवार यांना तुमच्या कर्जाचं नाव काढलं की,
म्हणतात राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. परवाची एक गोष्ट सांगतो,
अजित पवार हे कोल्हापुरात आले होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली
नाही, ३१ मार्चच्या आतमध्ये कर्ज भरा.
जणू काही त्यांनी जसं ७० हजार कोटी हाणलेत, तसं आपणही हणलेत, असं त्यांना वाटतंय. त्यामुळे चार दिवसांत आपण कर्ज भरणार, ह्या भ्रमात होते ते. आपणही कुठंतरी हात मारलेला आहे आणि
अजितदादांनी सांगितलं आहे, म्हटल्यावर आपण लगेच जाऊन पैसे भरणार आहोत. ते
आपल्याला चार दिवसांची मुदत देत होते. अजित पवार हे २८ तारखेला कोल्हापूरला
आले होते आणि म्हणतात की, ३१ तारखेच्या आतमध्ये कर्ज भरा; माफ होणार नाही.
ते केाल्हापूरला विमानाने आले होते. विमानतळावरून सोळा मिनिटांत
जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेवढ्या काळात सरकारी गाडीचा एसी बंद
पडला होता. गड्याला राग आला. कलेक्टरला म्हणाले नवी गडी घ्या. कलेक्टर
म्हणाले, मंजुरी घ्यावी लागेल. ते म्हणाले, प्रोटोकॉल बाजूला ठेवा आणि मी
सांगतोय म्हणून घ्या. काय XXX असते का अजित पवार?, असा सवालही त्यांनी
उपस्थित केला.
ते म्हणाले, सोळा मिनिटे एसी मिळाला नाही; म्हणून उकाड्याने हैराण झालेला माणूस प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतात. अरे दिवसाढवळ्या एकाच दोरीला गळफास घेऊन बाप आणि लेक मरायला लागलेत, लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. दया यायला पाहिजे शेतकऱ्यांची, पण त्यांना दया येत नाही, यापेक्षा तुम्हाला राग येत नाही, याचं मला वाईट वाटतं. तुम्हाला राग येत नाही, याचा मला राग येतो. सोळा मिनिटं एसी बंद पडलेला ह्या गड्याला सहन झाला नाही. मग हे आमचे शेतकरी आणि आई-बहिणी ४२ डिग्रीमध्ये कसे काम करत असतील?. तुम्हाला फक्त १६ मिनिटं एसी बंद पडल्याचा एवढा राग आला.दरम्यान, याच सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केलेला एक व्हिडिओ ऐकवला. आपल्याला फसवलं गेलंय आणि आपला जो विश्वासघात झाला आहे, तो मुकट्याने सहन करायचा नाही, त्यांना तुडवायला आपण कमी करायचं नाही. भाजपच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या तीन पक्षाच्या महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे कारंजातच जाहीर केले होते, असा दावाही राजू शेट्टी यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.