Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंबानी सोडणार 15000 कोटींचं राहतं घर? Antilia च्या जमिनीची मालकी..; अवघ्या 'इतक्या' कोटीत सौदा पण..

अंबानी सोडणार 15000 कोटींचं राहतं घर? Antilia च्या जमिनीची मालकी..; अवघ्या 'इतक्या' कोटीत सौदा पण..


मुंबईमधील अँटेलिया हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचं आलिशान घर आहे. या घरामध्ये मुकेश अंबानी पत्नी निता अंबानी आणि मुलं, सुनांबरोबर राहतात.


जगातील सर्वात महागडं खासगी निवासस्थान असलेल्या अँटेलियाची किंमत 15 हजार कोटी रुपये इतकी आहे. जगभरामध्ये या घराबद्दल विशेष उत्सुकता आहे. मात्र अंबानींच्या या 27 मजली घरासंदर्भात एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

आधी या जमिनीवर काय होतं?

अंबानींचं हे 15 हजार कोटींचं घर एका अनाथाश्रमशीसंबंधित जमिनीवर उभारण्यात आलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी 2005 साली ही जमीन विकत घेतल्यापासून ती वादात अडकली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अँटेलिया ज्या जमीनीवर बांधण्यात आलं आहे ती जमीन चुरीमभॉय इब्राहिम यतिमखाना या अनाथाश्रमाच्या नावावर होती. या जमिनीचे मूळ मालक प्रसिद्ध उद्योज सर फिरोजभॉय चुरीमभॉय इब्राहिम हे होते. खोजा मुस्लिम समाजातील चुरीमभॉय यांनी 1895 साली त्यांच्या समाजातील अनाथ आणि बेवारस मुलांसाठी हे आश्रम बांधलं होतं.

वफ्फ बोर्डाकडे आलं नियंत्रण

त्यानंतर पुढील काही वर्षांमध्ये चुरीमभॉय अनाथाश्रमचं नियंत्रण आणि व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य वफ्फ बोर्डाकडे आलं. वफ्फ बोर्डाला ही जमीन 2002 साली मुकेश अंबानींच्या मालकीच्या मुफिन-अँटेलिया कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकण्याची परवानगी मिळाली.

अगदी स्वस्तात मिळाला भूखंड

प्रसारमाध्यमांमधील वृ्त्तानुसार, मुकेश अंबानी यांनी या जमिनीसाठी अवघे 2.5 मिलियन अमेरिकी डॉलर्स (सध्याच्या दरानुसार भारतीय चलनामध्ये 21 कोटी 34 लाख 61 हजार 875) इतकी किंमत मोजली. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 18 मिलियन अमिरेकी डॉलर्स (सध्याच्या दरानुसार भारतीय चलनामध्ये 153 कोटी 73 लाख 80 हजार 864) इतकी होती. त्यानंतर अंबानी कुटुंबाने या जमिनीवर आपलं आलिशान घर उभारण्याची परवानगी मिळवली. 2003 साली मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी घर बांधण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर 2006 साली प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.

फेरफार केलेला असा दावा

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये, मुकेश अंबानींना 'बेकायदेशीरपणे' 2005 साली विकण्यात आलेल्या जमिनीवर अँटेलियाची आलिशान इमारत उभारण्यात आली आहे, असा दावा करण्यात आलेला. 'लाइव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रतिज्ञापत्र संदेश तडवी यांनी सादर केलं होतं. अल्पसंख्यांक विकास विभागाचे सहाय्यक सचिव असलेल्या संदेश आणि त्यावेळीच्या महाराष्ट्र वफ्फ बोर्डाच्या कार्यकारी मुख्य अधिकाऱ्यांनी या जमिनीचा व्यवहार झाला तेव्हा तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुकेश अंबानींना जमीन विकली होती तेव्हा फेरफार केलेला असा दावा, प्रतिज्ञापत्रात करण्यात आलं.

न्यायालयाने काय सांगितलेलं?

त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती मंजुळा चील्लूर यांच्या खंडपीठाने 21 जुलै 2017 रोजी दिलेल्या आदेशामध्ये, राज्यातील वफ्फ बोर्डाला या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. धर्मादाय आयुक्तांनी अनाथाश्रमाची जमीन विकण्यापूर्वी परवानगी घेण्यात आली नव्हती असं न्यायालयामध्ये सांगितल्यानंतर वफ्फ बोर्डाला भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आलेलं.

राज्य वफ्फ बोर्डाने अँटेलियाला पाठवली नोटीस

त्यावेळी महाराष्ट्र राज्य वफ्फ बोर्डाने हा जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर असल्याचं सांगत अँटेलिया कमर्शिअलला नोटीस पाठवली होती. यामध्ये त्यांनी वफ्फ कायदा 1952 मधील कलम 52 चं उल्लंघन केल्याचं नमूद केलेलं. यामध्ये वफ्फ बोर्डाच्या परवानगीशिवाय कोणतीही स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करता येत नाही. तसं केल्यास ते बेकायदेशीर मानलं जातं, असं सांगण्यात आलेलं.

वफ्फ ट्रेब्युनलसमोर झाली सुनावणी

2004 साली 22 एप्रिल रोजी वफ्फ ट्रेब्युनलसमोर या नोटीसला आवाहन देण्यात आलं. यावेळेस राज्य वफ्फ बोर्डाच्या सीईओंनी ट्रस्टबरोबरचा हा वाद मिटवला आणि ट्रस्टींनी ही जमीन वफ्फ बोर्डची संपत्ती होती असं स्वीकारण्यास होकार दर्शवावा असं ठरवण्यात आलं. वफ्फ कायदा 1995 मधील कलम 72 नुसार दरवर्षी वफ्फ बोर्डाला 16 लाख रुपये देण्याचे निर्देश वफ्फ ट्रेब्युनलने दिले. आधी ट्रस्टने सध्या अँटेलिया उभी असलेली जमीन ही वफ्फच्या मालकीची नसल्याचा दावा ट्रस्टने केलेला. मात्र नंतर हा दावा त्यांनीच मागे घेतला.

ओवैसींचं विधान

एआयएमआएमचे नेते आणि हैदराबादचे खासदार अससुद्दीन ओवैसी यांनी अंबानींचं अँटेलिया हे आलिशान घर उभं असलेली जमीन ही केवळ चॅरिटेबल कामांसाठी वापरण्याची मूभा आहे असं विधान नुकतेच केलं होतं. मात्र ट्रस्टने नियम मोडून ही जमीन मुकेश अंबानींनी विकल्याचं ओवैसींनी म्हटलं होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.