जयसिंगपूर, ता. १३ : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त दिले जाणारे 'एसजीयू आयकॉन' पुरस्कार जाहीर झाले आहेत. सिने क्षेत्रात अभिनेता मकरंद अनासपुरे, क्रीडा क्षेत्रात नेमबाज स्वप्नील कुसाळे, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अशोक पुरोहित, शैक्षणिक क्षेत्रात डॉ. अनिल पाटील, उद्योग क्षेत्रात महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे समीर महाबल यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार वितरण २८ फेब्रुवारीला अभिनेता आयुषमान खुराना आणि संजय घोडावत यांच्या उपस्थितीत संजय घोडावत विद्यापीठ, अतिने येथे होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.
या वेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आयुषमान खुराना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खुराना एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता, गायक, निर्माता आणि टेलिव्हिजन होस्ट आहेत. अभिनेते मकरंद अनासपुरे प्रतिभाशाली मराठी अभिनेता आणि नाटककार आहेत. त्यांचे नाम फाउंडेशनअंतर्गत मोठे सामजिक कार्य आहे.क्रीडा क्षेत्रातून स्वप्नील कुसाळे यांनी नेमबाजी खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नावलौकिक केला आहे. डॉ. अशोक पुरोहित प्रसिद्ध ईएनटी सर्जन, पुरोहित हॉस्पिटल, सांगली यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ. अनिल पाटील यांचे रयत शिक्षण संस्थेतून महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. उद्योग क्षेत्रात महाबल समूह पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रगत उत्पादन तंत्राचा लाभ देत आहे. या सर्वांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 'एसजीयू आयकॉन पुरस्कार' २०२५ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.