Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'देखो भाई, वो ठीक नही है, अभी.' अमित शहांनी शिंदेंना स्पष्टच सांगितले, बैठकीचा खळबळजनक तपशील समोर

'देखो भाई, वो ठीक नही है, अभी.' अमित शहांनी शिंदेंना स्पष्टच सांगितले, बैठकीचा खळबळजनक तपशील समोर
 
 
मुंबई : गृहमंत्री अमित शहा हे फेब्रुवारी महिन्यात पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पहाटे चार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली होती. यावेळी सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही. माझे निर्णय फिरवले जातात, अशी खदखद शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली, असा दावा 'सामना' रोखठोकमधून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व्हायचे, तर पक्षाला भाजपात विलीन करा, असे अमित शहा यांनी शिंदे यांना सांगितले, असेही रोखठोकमध्ये म्हणण्यात आले आहे.

रोकठोकमध्ये काय म्हटले?

एकनाथ शिंदे हे शनिवारी, 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 'वेस्टइन' हॉटेलात ही भेट झाली. 57 आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता. "सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत", असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहांना भेटले. "बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा, केंद्राने हस्तक्षेप करावा" हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत. कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत. शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता.

अमित शहा अन् शिंदेंमध्ये काय चर्चा झाली?
अमित शहा - क्या शिंदेजी, सुबह के चार बज रहे है, इतना क्या अर्जंट है?
शिंदे - आपको सब मालूम है, यहा क्या हो रहा है.
शहा - क्या हो रहा है?
शिंदे - माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत.
शहा - ऐसा कैसा हो सकता है? मै देवेंद्र से बात करता हूं.
शिंदे - मुझे दबाने की, खतम करने की पुरी कोशिश हो रही है. आप के भरोसे हम आपके साथ आये. आपका वादा था, चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहुंगा.
शहा - हमारे 125 लोग चुनकर आये… तो आप कैसा क्लेम कर सकते हो?
शिंदे - मेरे नेतृत्व में चुनाव हुवा.
शहा - नहीं, मोदीजी के चेहरे पर चुनाव हुवा. आप को क्या चाहिये बोलो… मै कोशिश करूंगा.
शिंदे - मुख्यमंत्री.
शहा - देखो भाई, वो ठीक नही है. अभी नही हो सकता. पार्टी का ही मुख्यमंत्री होगा.
शिंदे - मै क्या करूं?
शहा - आप बीजेपी में मर्ज हो जाओ. आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नही बनेगा. आपका रिस्पेक्ट हमने रखा है।
शिंदे - फिर हमारे पार्टी का क्या?
यावर, 'वो हमारे पे छोड दो. वो पार्टी हमनेही बनायी. आप चिंता मत करो,' असे शहा यांनी सांगितले आणि पहाटेची बैठक संपवली, असे सांगणारे भाजपचेच लोक आहेत," असा दावा रोखठोखमधून करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.