Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

''या'' गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फ केलं जाईल , मुख्यमंत्री फडणवीसांचा पोलीस यंत्रणेला मोठा इशारा

''या'' गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फ केलं जाईल , मुख्यमंत्री फडणवीसांचा पोलीस यंत्रणेला मोठा इशारा
 

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले असून राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान आता मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोड आले असून त्यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला एक मोठा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा इशारा दिला आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही. त्याला थेट बडतर्फ केले जाईल, त्यासंदर्भात अशा सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलीस परिषद शनिवारी झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्याची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, परिषदेत देशात नवीन तयार झालेल्या तिन्ही कायद्यांचे अंमलबजावणीचे सादरीकरण झाले. सायबर प्लॅटफॉर्म सादरीकरण झाले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपपत्र जलद गतीने न्यायालयासमोर वेळेत कसे जाईल त्यावर चर्चा झाली. ड्रग्स संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ड्रग्स संदर्भात झिरो टोलरन्सी पॉलीसी असणार आहे. या प्रकरणात कोणताही पोलीस कर्मचारी किंवा कोणत्याही रँकमधील अधिकारी सापडला तरी त्याचे थेट निलंबन करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उद्योगांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच महिला अत्याचार संदर्भात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे हा प्रयत्न असेल. त्याचे ट्रॅकींग आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. नवीन कायद्यात एखाद्या गुन्ह्यात लोकांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याची तरतूद तयार केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. सहा महिन्यांत लोकांचा मुद्देमाल परत गेला पाहिजे. म्हणजे पोलिस ठाणे रिकामी होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.