Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्राध्यापक भरतीवरील बंदी उठली; नवीन कार्यपद्धतीनुसार होणार भरती

प्राध्यापक भरतीवरील बंदी उठली; नवीन कार्यपद्धतीनुसार होणार भरती
 

मुंबई:  राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांवरील भरती प्रक्रियेवर राजभवन कार्यालयाने घातलेली बंदी गुरुवारी उठवण्यात आली. राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे.

निवड प्रक्रियेतील अधिक पारदर्शकतेसाठी अध्यापक भरती प्रक्रियेत गुणांकन पद्धतीचा नव्याने अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. ते म्हणाले, 'राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यात शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरली जाणार आहे.
या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक, निष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण देण्यात येणार आहेत. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र ठरणार आहेत.'

अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्रावीण्य यांचे मूल्यमापन हे परिसंवाद अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक अथवा अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी विचारात घेण्यात येतील. निवड समितीच्या बैठकांचे दृक-श्राव्य चित्रीकरण करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चित्रीकरण, सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

त्वरित निकाल लागणार
ते म्हणाले, की संबंधित उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. ही सर्व निवड प्रकिया सहायक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील.

नवीन निवड प्रक्रियेच्या अधीन राहून विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेली प्राध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरिता याच कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या सुधारित कार्यपद्धतीमुळे गुणवत्ताधिष्ठित प्राध्यापकांची निवड होईल. तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नि:ष्पक्ष करण्यासाठी अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. मुलाखती ही सर्व निवड प्रकिया सहाय्यक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील.

- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.