मिरजेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या घरी भेट,
समित कदम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकास कामाचे उद्घाटन संपन्न, राहुल नार्वेकर यांचे कडून कौतुक
मिरज :- जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली-मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल, हनुमान मंदीर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्त्याचे सुधारणा करणे या विकास कामाचा उद्घाटन सोहळा.महाराष्ट्र राज्याचे विधानसभा, अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, यांच्या शुभहस्ते ,संपन्न झाला.
यावेळी . खासदार विशाल (दादा) पाटील आमदार .डॉ. सुरेश (भाऊ) खाडे आमदार विश्वजीत कदम , सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक डॉ रविंद्र आरळी सांगली महापालिकेचे आयुक्त.शुभम गुप्ता (भा.प्र.से.) अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे महादेव अण्णा कुरणे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते , निताने जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या घरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट दिली माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी राहुल नार्वेकर यांना जगविख्यात तंतुवाद्य सतार प्रतिकृती भेट देऊन त्याचा सन्मान केला , सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी समित दादा कदम यांच्यासह लोकप्रतिनिधीं मोलांची कामगिरी केल्याने त्याचे कौतुक होत आहे. राहुल नार्वेकर यांनी केले , सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रा साठी पायाभूत सुविधा बाबत कौतुक करून अगमी काळात सांगली हे मेडिकल हब म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.