विधानसभा निवडणुकीत भाजपची सुपारी घेऊन काँग्रेस विरोधात बंडखोरी करायला लावणाऱ्या दलालांनी विकासाचा विचार घेऊन पुढे निघालेल्या पृथ्वीराज बाबा पाटील यांची मापे काढू नयेत:, बिपीन कदम
सांगली :- विधानसभा निवडणुकीत भाजपची सुपारी घेऊन काँग्रेस विरोधात बंडखोरी करायला लावणाऱ्या दलालांनी विकासाचा विचार घेऊन पुढे निघालेल्या पृथ्वीराज बाबा पाटील यांची मापे काढू नयेत, असे प्रत्युत्तर सांगली दक्षिण शहर कांग्रेसचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले.
काँग्रेसच्या प्रदेश बैठकीत पृथ्वीराज बाबा पाटील यांनी श्रीमती जयश्री पाटील यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊ नये अशी मागणी केलेली आहे. त्यावर टीका करताना माझे महापौर किशोर शहा यांनी पृथ्वीराज पाटील यांना तुम्ही काँग्रेसमध्ये आहात का असा सवाल केला आहे. त्याला बिपिन कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
त्यांनी म्हटले आहे की, बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांना काँग्रेसचे किती काळजी आहे याबद्दल सांगलीतल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी का झाली, याचे ओपन सिक्रेट बच्चा बच्चा जानता है. या सगळ्यात दलाली कुणी किती केली आणि कितीला केली, याच्या सूरस कथाही आता चर्चेत आहेत. ही बंडखोरी करण्यामागे कुणाकुणाचा हात आहे, त्यांचे कसे कोटकल्याण झाले आहे, याचा हिशोब मांडायची वेळ किशोर शहा तुम्ही आमच्यावर आणु नका. सन 1999 चा अपवाद वगळता १९८६पासून सांगलीत विधानसभेला काँग्रेस सातत्याने पराभूत होत आली आहे. त्यामध्ये आपल्यासारख्या कर्तृत्ववान लोकांचा वाटा मोठा आहे. स्व. मदनभाऊ पाटील यांना दगा फटका करण्यात सध्याचे बंडखोरं समर्थक पुढे होते. ते कुणाच्या इशाऱ्यावर दगा फटका करत होते, तेही सगळ्या सांगलीला माहिती आहे.
किशोर शहा यांनी आमचे नेते पृथ्वीराजबाबा यांच्या संस्थेची अजिबात काळजी करू नये. ती पारदर्शीपणे आणि सक्षमपणे सुरू आहे. तुमचे कर्तृत्व काय ते आधी सांगा. सांगलीच्या भूखंडांचा व्यापार करणाऱ्यांनी लोक कल्याणासाठी काय केले हे सांगावे. काँग्रेसचा पाहिजे तेव्हा वापर करून घ्यायचा आणि आपली गरज संपल्यानंतर काँग्रेसला खड्ड्यात घालायचे हे धोरण तुम्ही वर्षानुवर्षी चालवत आला आहात. तुमचा आणि काँग्रेसचा संबंधच काय? विचारापेक्षा राजकीय स्वार्थाने तुम्ही पछाडलेले आहात. तुम्ही भाजपची बी टीम आहात हेही काही लपून राहिलेले नाही.बंद दरवाजा फोडून आत गेल्याची गोष्ट करण्यापेक्षा यावेळी डिपॉझिट का जप्त झाले याचे विचार मंथन किशोर शहा यांनी करावे. : बंडखोर गटाच्या मदतीशिवाय आणि समर्थन शिवाय बाबांना 76 हजारा वर मते मिळाले आहेत. ती काँग्रेसच्या विचारावर विश्वास ठेवणारी आणि पृथवीराज बाबांनी लोकसंपर्कातून निर्माण केलेल्या कामाला साथ देणारी आहेत. सांगली कुणाची मक्तेदारी नाही. मालकी तर अजिबात नाही. बाबांच्या भाजप संपर्कावर बोट ठेवण्याआधी आपले नेते कोणाकोणाला भेटून आले याचा हिशोब बघा. आम्ही उघड मैत्री करतो, राजकारणात पलीकडे करतो. तुम्ही घातकी राजकारण करता. त्यामुळेच तुमचे डिपॉजिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. पृथ्वीराजबाबा यांच्या दोन वेळेच्या पराभवापेक्षा आपल्या पराभवांची हैट्रिक झाली आहे हे विसरू नका. लोकसभेला आम्ही काम केले नसते तर सांगलीमध्ये १९००० चे लीड मिळाले असते का? अजून वेळ गेलेली नाही दलालीचे राजकारण करू नका, विकासाचे करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.