Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रशांत कोरटकरची जिरली! शिवरायांच्या पुतळ्यासमोर झाला नतमस्तक, पण...

प्रशांत कोरटकरची जिरली! शिवरायांच्या पुतळ्यासमोर झाला नतमस्तक, पण...
 

नागपूर : छत्रपत शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरची आता चांगलीच जिरली आहे. त्यानं एक व्हिडिओ पोस्ट करत शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाला आणि कृतज्ञता व्यक्त केली. पण अद्याप जाहीर दिलगिरीही व्यक्त केलेली नाही.

व्हिडिओत काय म्हटलंय?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करत, त्यासमोर नतमस्तक होत असतानाचा कोरटकर यामध्ये दिसतो आहे. यावेळी त्यानं म्हटलं की, "जगभरात महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो. ज्यांच्या कथा, शौर्य ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. आजही त्यांच्या कहाण्या आणि कथा प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या असतात.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत रायगडाला अनेक वेळा भेट देण्याचा योग आला. त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा नतमस्तक होण्याचा योग आला, अशा छत्रपतींना मानाचा मुजरा! जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र"



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.