Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वारंवार विमानतळावर जायचा हा पठ्ठ्या, कोणतेही काम न करता श्रीमंतासारखं होतं जगणं, त्याची ही ट्रिक पाहून पोलीसही गेले चक्रावून

वारंवार विमानतळावर जायचा हा पठ्ठ्या, कोणतेही काम न करता श्रीमंतासारखं होतं जगणं, त्याची ही ट्रिक पाहून पोलीसही गेले चक्रावून
 

राजस्थानमधील जयपूर येथील एका तरुणाच्या श्रीमंतीचा घडा लवकरच फुटला. येथील एक तरूण वारंवार जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर यायचा. तो कोणतेही काम न करता श्रीमंतासारखा जगायचा. त्याच्यावर अनेक दिवसांपासून पोलिसांचा संशय होता.

काही दिवसांपूर्वी त्याच्या हालचालींवरून त्याच्यावरचा संशय अधिक बळावला होता. पोलिसांनी एक दिवस त्याची कसून चौकशी केली. तो पोपटासारखा बोलला. त्याची कमाईची ट्रिक ऐकून पोलीस दल पण चॅट पडलं. त्याचे थेट दुबई कनेक्शन उघड झालं. आता पोलीस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

सायबर पोलीसांची कारवाई
राजस्थान पोलीस मुख्यालयाच्या गँगस्टर विरोधी पथकाने राजधानी जयपूरमध्ये या बुधवारी ही कारवाई केली. त्यांनी तरुणाच्या माध्यमातून जागतिक रॅकेटचा पर्दाफाश केला. सिरसी रोड येथील यशवंत सिंह पवार नावाच्या तरुणाला पथकाने पकडले. तो शास्त्री नगरातील गुर्जर कॉलनीत राहतो. त्याच्या ताब्यातून पथकाने 61 सक्रिय असलेले मोबाईल सिम आणि दोन मोबाईल जप्त केले. त्याला रिमांडमध्ये घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली. ही कारवाई गँगस्टर विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धांत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आरोपी यशवंत पवार हा दुबईतील सायबर भामट्यांसाठी आणि त्यांच्या गटासाठी काम करत असल्याचे समोर आले. तो अरूणाचल प्रदेश आणि आसाम येथून बोगस सक्रिय सिम कार्ड मागवत असे. हे सिम कार्ड तो दुबईतील सायबर भामट्यांना पाठवत होता. हे मोबाईल सिम दुबईला जाणाऱ्या विमानांनी कुरिअर म्हणून पाठवण्यात येत होती.
आता साथीदारांचा पाठलाग

हे सिम एका छोट्या बॉक्समध्ये ठेवण्यात येतात. एक बॉक्समध्ये 30 ते 40 सिम टाकून ते सक्रिय करण्यात येतात. भारतीय क्रमांक टाकून हे सिम सक्रिय करण्यात येतात. त्यानंतर दुबईत कॉल सेंटर चालवणारा अभिषेक नावाचा व्यक्ती विविध मोबाईल गेमिंग ॲप आणि इतर पद्धतीने सायबर फसवणूक करतो. आतापर्यंत या गँगमध्ये योगेंद्र खिंची, इंद्र, जतीन आणि हरमीत सिंह सारख्या आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.