शिरूर: शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पुणे येथील एका मंडलाधिकाऱ्याची खाजगी गाडी 'महाराष्ट्र शासन 'अशी पाटी लावून आली. ही बाब सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना या गाडीवर कारवाई करण्याबाबत मागणी केली.
वाळुंज यांनी सजग नागरिकांसह आवाज उठवल्यानंतर वाहतुक पोलीसांकडून संबंधित वाहन मालक यांच्यावर त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात येवून त्याच ठिकाणी दंडही पोलिसांनी भरून घेतला. अशा पाट्या लावून फिरणाऱ्या सरकारी बाबूंच्या गाडीवर शिरूर मधे झालेली ही पहिलीच कारवाई आहे. शिरूर तालुक्यातील नवीन प्रशासकीय
इमारतीमधील वाहनतळावर पुणे महसूल खात्यातील एक अधिकारी स्वतःच्या वाहनावर
आतील दर्शनी भागात "महाराष्ट्र शासन" अशी पाटी लावून तहसीलदारांच्या शासकीय
गाडीजवळ त्यांचे वाहन लावून थाटात दाखल झाले. "महाराष्ट्र शासन" पाटी
असल्याने तेथील सुरक्षा रक्षकाने गाडी मागे घ्यायला सांगून बाजूला असलेल्या
दुसऱ्या सरकारी वाहनाशेजारी बॅरिगेट बाजूला करून गाडी लावण्यासाठी जागा
दिली.
सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा तहसील कार्यालयात स्वतःची वाहने लावयला जागा नसते, मात्र समोरील बाजूस शासकीय वाहनांसाठी बॅरिगेट्स लावून ठेवले जातात. जेणेकरून इतर नागरिक वाहन लावू शकणार नाहीत. जागा असूनही नागरिकांची मात्र यामुळे गैरसोय होत असते, परंतु काही अधिकारी/कर्मचारी स्वतःच्या वाहनांना "महाराष्ट्र शासन" पाटी लावून थाटात येतात आणि त्यांना सुरक्षारक्षक शासकीय गाडी समजून तत्काळ बॅरिगेट्स हटवून जागा करून देतात ही बाब चुकीची असून तेथे उपस्थित असलेले वाळुंज यांना हे निदर्शनास आल्यानंतर ते नागरिकांसह गाडीजवळ जाऊन ही बाब शिरूर पोलीस निरीक्षक केंजळे यांना कळवली आणि कारवाई करण्याची मागणी केली.पोलिस निरीक्षक यांनी तत्काळ वाहतूक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांना घटनास्थळी पाठवले. वाघमोडे यांनी वाहन चालक आणि मालक यांना अशी पाटी लावून तुम्हाला वाहन फिरवता येणार नाही, असे सांगून लावलेल्या पाटीसह मशिनद्वारे फोटो काढून तत्काळ ऑनलाइन ५००/- रुपये दंड आकारून कायदेशीर कारवाई केली. शिवाय हा दंड ही जागेवरच लगेच ऑनलाइन पेमेंट पद्धतीने भरून घेण्यात आला. आणि लावलेली पाटीही तत्काळ उतरवण्यास सांगितली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.