Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील महात्मा फुले सोसायटीतील रिकाम्या जागा गर्दुल्यांचा अड्डा हटकणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर फोडल्या दारूच्या बाटल्या

सांगलीतील महात्मा फुले सोसायटीतील रिकाम्या जागा गर्दुल्यांचा अड्डा हटकणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर फोडल्या दारूच्या बाटल्या
 

सांगली : सांगली जिल्ह्यात नशा मुक्त भारत अभियान जोरदार सुरू आहे. त्यासाठी टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे. मात्र तरीही नशेबाजांची नशेबाजी सुरूच असल्याचे चित्र आहे. सांगलीतील कुपवाड रस्त्यावरील महात्मा फुले सोसायटीतील रिकाम्या जागा गर्दुल्यांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे. या नशेबाजांना हटकणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर दारूच्या बाटल्या फोडल्या जात आहेत. याबाबत संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करूनही नशेबाजांचा हा अड्डा सुरूच आहे.  

जिल्ह्यात नशा मुक्त भारत अभियान जोरदारपणे राबवले जात आहे. गांजा, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्या, एमडी ड्रग्ज अशा अंमली पदार्थ विक्री, तस्करी करणाऱ्यांवर गेल्या महिन्याभरापासून जोरदार कारवाई करण्यात येत आहे. अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांच्या रॅकेटपर्यंत यंत्रणा पोहोचल्या आहेत. मात्र तरीही सांगलीतील नशेबाजी काही कमी झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे केवळ अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवरच नाही तर नशेबाजांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सांगलीतील कुपवाड रस्त्यावरील महात्मा फुले सोसायटीतील रिकाम्या जागेत कोणीतरी पत्र्याचे शेड उभारले आहे. या परिसरात अंधार असल्याने रात्री या भागात गर्दुल्यांचा अड्डाच या परिसरात भरतो. गांजा, दारूसह अंमली पदार्थाचे सेवन करून तरूणाई झिंगल्याचे चित्र या भागात दिसते. नशा केल्यानंतर या तरूणांकडून सोसायटीतील नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. या भागातून सायंकाळनंतर महिलांना फिरणेही अवघड झाले आहे. त्यात काही नागरिकांनी धाडस करून त्या गर्दुल्यांना हटकण्याचाही प्रयत्न केला. मात्र नशेत तर्रर्र असलेल्या या गर्दुल्यांनी संबंधित नागरिकांच्या दारातच दारूच्या बाटल्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी याबाबत संबंधित यंत्रणांनाही कल्पना दिली आहे. मात्र त्या गर्दुल्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही शिवाय त्यांचा अड्डा अजूनही तसाच सुरू असल्याचे चित्र आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.