Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इडली आरोग्यास घातक ; सरकारने का घातली बंदी ?

इडली आरोग्यास घातक ; सरकारने का घातली बंदी ?
 

सकाळचा नाष्टा आरोग्यास पोषक हवा असा सांगितला जातो. कारण सकाळचा नाश्ता जेवढा पौष्टिक तेवढं तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. मागील गेल्या काही वर्षांमध्ये अनेकाच्या आहाराच्या सवयी बदलल्या आहेत. कोणी सकाळी पोहे-उपमा खाते तर कोणी हलकी फुलकी इडली खाण्याला पसंती देते. आंबवून तयार करण्यात येणारी इडली आरोग्यासाठी पौष्टिक असते. कित्येकजणांच्या घरात रविवारी हमखास इडली बनवली जाते. काहींना तर ऑफीसला जाताना उशीर होतो म्हणून थेल्यावर मिळणारी इडली खायची सवय असते.

पण, हीच इडली आता तुमच्या आरोग्यास घातक आहे, असं म्हटलं तर? जी इडली आरोग्यास पोषक असते आणि पचायला हलकी असते. तीच इडली कॅन्सरसारख्या आजारांना गंभीर आजांराना आमंत्रण देणारी असल्याने कर्नाटक सरकारने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण, सरकारने हा निर्णय का घेतला? नक्की प्रकरण काय? जाणून घेऊयात
पचायला हलकी असल्याने इडली हमखास खाल्ली जाते. पण, याच इडलीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण मिळत असल्याने आता याच इडलीवर बंदी आणली आहे. कर्नाटकमध्ये आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी इडली तयार करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्लास्टीक शीटच्या वापरावर याच कारणास्तव बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाला परीक्षणातून मिळालेल्या निष्कर्षांनुसार तेथील 52 हॉटेलांमध्ये इडली तयार करण्यासाठी पॉलिथीन शीटचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
या शीटमध्ये असणारे कित्येक घटक आरोग्यास हानिकारक असल्याचे ठाऊक असतानाही हॉटेलमध्ये त्यांचा वापर सुरूच असल्याकारणाने राज्यातील आरोग्य विभागाने या हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याचदरम्यान 251 ठिकाणचे नमुने परिक्षणासाठी आणण्यात आले होते. यापूर्वी इडली तयार करण्यासाठी कापडाचा वापर केला जायचा. पण, मिळालेल्या माहितीनुसार काही हॉटेल प्लास्टीक शीट वापरत असल्याचे कळताच ही कारवाई करण्यात आल्याचे राव यांनी माध्यमांना सांगितले आहे.

इ़डली तयार करताना जेव्हा प्लास्टीकचा वापर केला जातो तेव्हा प्लास्टीकमधील विषारी घटक अन्नात मिसळून मानवी शरीरास धोका निर्माण होतो, ज्यामुळे हॉटेलांनी इडली बनवण्यासाठी इतर पर्यायांचा वापर करावा असे आवाहन कर्नाटक आरोग्य विभागाने केलं आहे. इतर राज्यात अजून तरी हा नियम लागू करण्यात आलेला नाही. पण, जिथे इडली बनवण्यासाठी प्लास्टीकचा वापर केला जातो तिथे आरोग्याला धोका उद्भभवतो, असे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.