पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशात आता पोलीस यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 13 बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक (एसपी), उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि आयपीएस पदावरील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृहखात्याने पोलि अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. या बदल्यांमुळे गृह खात्यात खळबळ उडाली आहे.
बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची यादी
यशस्वी यादव - अपर पोलीस महासंचालक, सायबर, महाराष्ट्रसुहास वारके - अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सेवासुधारअश्वती दोर्जे - अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागछेरिंग दोर्जे - अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान)के. एम. मल्लिकार्जून प्रसन्ना - अपर पोलीस महासंचालक (प्रशासन)राजीव जैन - विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बलअभिषेक त्रिमुखे - अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबईश्रेणिक लोढा - अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणामनोज कुमार शर्मा - विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था)आर. बी. डहाळे - विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्रअशोक मोराळे - विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभागनिखिल गुप्ता - अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था)सुरेश मेखला - अपर पोलीस महासंचालक. आर्थिक गुन्हे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.