बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाने गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असे म्हणत जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे. त्यामुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली असून नेमकं बीड जिल्ह्यात आहे तरी काय ज्यामुळे पोलीस अधिकारी ड्युटी करायचं नको म्हणत आहेत,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तसचं उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्यां बीड जिल्ह्यात का नको? या अगोदर अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती. मात्र अचानकच बदलीसाठी विनंती अर्ज आल्याने चर्चा होत आहे. अजित पवार यांनी पालकमंत्री पदाची चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम आहे दिला होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे वाढलेला जातिवाद, त्यातून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे बीड जिल्हाच नको असे काही अधिकारी खासगीत नको म्हणत आहेत. बीड जिल्ह्यातील एकूण पोलीस निरीक्षक ते उपविभागीय पोलिस अधिकारी अशी 188 पदे आहेत. त्यापैकी कार्यरत 172 आहेत. या पैकी 107 लोकांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले. काही जणांनी राज्याच्या पोलीस महासंचालकाकडे अर्ज केला आहे.
आतापर्यंत किती अर्ज आले?
विशेष महानिरीक्षकाकडे यामधे बीड जिल्ह्यात एकूण 29 पोलीस ठाणे आहेत. या पैकी 15 ठाणेदारांचा बदलीसाठी अर्ज आहे तर पोलीस अधीक्षक कार्यालयअंतर्गत असलेल्या विशेष शाखेपैकी सहा जणांनाचा विनंती अर्ज आहे. या सर्व अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या मान्य केल्या तर फक्त जिल्ह्यात 65 अधिकारी शिल्लक राहतील त्यावरती बीडमध्ये पोलिसांचे काम कसे चालणार चालणार? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे 59 विनंती अर्ज तर छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महारीक्षक यांच्याकडे या 48 विनंती बदली अर्ज करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.