Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील 0-14 वयोगटातील मुलींना कॅन्सरविरोधी फ्री लस; कधी मिळणार लस, पाहा!

राज्यातील 0-14 वयोगटातील मुलींना कॅन्सरविरोधी फ्री लस; कधी मिळणार लस, पाहा!
 

कतंच जागतिक आरोग्य संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार, देशात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. अशातच आता कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे.

14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांत उपलब्ध होईल. देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतायत. त्यासाठी सरकारने हे मोठं पाऊल उचललंय. दरम्यान यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
प्रकाश आबिटकरांनी काय दिली माहिती?

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "जीवनशैली बदलल्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा आता कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. पूर्वी व्यसन असल्यावर कॅन्सर व्हायचा. पण, आता लहान मुलांनाही कर्करोग होताना दिसतंय. ही खूपच चिंतेची बाब आहे." राज्यातील ० ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्हीची लस मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती आबिटकर यांनी दिली.

देशात वाढतंय कॅन्सरचं प्रमाण
येत्या काही वर्षांत जगभरात स्तनाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढणार असल्याचं WHO ची कॅन्सर संस्था आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) यांनी म्हटलं आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या अभ्यासातून जगात दर मिनिटाला एका महिलेचा ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे.

२०५० पर्यंत जगभरात स्तनाच्या कॅन्सरचं निदान आणि मृत्यू वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेची कॅन्सर एजन्सी आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी व्यक्त केली आहे. तर २०५० पर्यंत जगभरात दरवर्षी ३२ लाख नवीन रुग्ण आणि १.१ दशलक्ष मृत्यू होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.