Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्र्यांकडून ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

 मुख्यमंत्र्यांकडून ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

मुंबई : राज्यातील सात बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. धाराशिवचे चर्चेतील जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची बदली करून कीर्ती किरण पुजार यांना धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत?


१. श्री राजेंद्र निंबाळकर (IAS: २००७) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२. श्री संजय यादव (IAS: २००९) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३. डॉ. राजेंद्र भारुड (IAS:२०१३) आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, RUSA, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

४. श्री दीपक कुमार मीना (IAS: २०१३) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


५. श्री समीर कुर्तकोटी (IAS: २०१३) यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

६. श्री महेश आव्हाड (IAS: २०१५) व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई यांना महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

७. श्री कीर्ती किरण पुजार (IAS: २०१८) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.