फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने ढोले यांची सिडको मधून उचलबांगडी केली व त्यानंतर त्यांना कोणतीही क्रीम पोस्टिंग देण्यात आलेली नव्हती. एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री असताना दिलीप ढोले हे त्यांचे खाजगी सचिव होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर
ढोले यांची नियुक्ती मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्त पदावर करण्यात आली.
ढोले हे शिंदे यांचे खाजगी सचिव असताना तसेच त्यानंतर ते मीरा-भाईंदर
महापालिकेत आयुक्त म्हणून गेल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य
कामे करण्याचा सपाटा लावला होता. याच दिलीप ढोलेंवर एकनाथ शिंदे यांचा राग
अनावर झाला. एकेकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत
असलेले मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या
प्रतापामुळे रागाच्याभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढोले यांना
सर्वांच्या समक्ष स्वतःच्या केबिनमधून गेट आउट म्हणत हाकलून लावले. शिंदे
यांचा संताप इतका अनावर झाला होता की, त्यांनी स्वतःचा चष्मा देखील
समोरच्या टेबलावर जोरदार आपटला.
मीरा-भाईंदर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असताना मीरा-भाईंदर महापालिकेत टाऊन प्लॅनिंग विभागात भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला होता. याबाबत सातत्याने ढोले यांच्याविरोधात राज्य सरकारकडे तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या, मात्र ढोले यांना शिंदे यांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. मात्र, त्यानंतर ढोले यांच्याबाबत थेट ईडीकडे तक्रारी गेल्या आणि त्यानंतर मात्र ईडीची पिडा मागे लागली. मात्र तरीही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आशीर्वादामुळे ढोले यांची मीरा-भाईंदर महापालिकेतून उचलबांगडी झाल्यानंतरही सिडकोमध्ये सह व्यवस्थापकीय संचालक पदावर वर्णी लावण्यात आली. तेथेही ढोले यांनी स्वतःचे उद्योग सुरूच ठेवले. त्यात राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने ढोले यांची सिडको मधून उचलबांगडी केली व त्यानंतर त्यांना कोणतीही क्रीम पोस्टिंग देण्यात आलेली नव्हती. मात्र मीरा-भाईंदर महापालिकेत वारमा पैसे खाण्याची चटक लागलेल्या ढोले यांनी एम एम आर क्षेत्रातील मोठ्या महापालिकेत आयुक्त पदावर स्वतःची वर्णी लावून घेण्यासाठी लॉबिंग सुरू केली. यामध्ये वसई विरार महापालिका आयुक्त पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांनी मिळवले आणि त्यावरून एकनाथ शिंदे हे संतापल्याचे सांगण्यात येते.
गेले काही महिने क्रीम पोस्टिंग साठी ढोले हे शिंदे यांच्या सतत मागे पुढे फिरत आहेत. तथापि मीरा-भाईंदर महापालिकेत आयुक्त असताना आणि त्यानंतर सिडकोमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक असताना ढोले यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची देखील दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर माया जमवल्याच्या तक्रारी शिंदे यांच्यापर्यंत गेले आहेत आणि त्यामुळेच शिंदे हे ढोले यांची कोणतीही नवीन नियुक्ती करण्याच्या मानसिकतेत नसताना सतत भेटीसाठी केबिनमध्ये ताटकळत असलेल्या ढोले यांना पाहून शिंदे यांचा संताप अनावर झाल्याचे सांगण्यात येते.
एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री असताना दिलीप ढोले हे त्यांचे खाजगी सचिव होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ढोले यांची नियुक्ती मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्त पदावर करण्यात आली. ढोले हे शिंदे यांचे खाजगी सचिव असताना तसेच त्यानंतर ते मीरा-भाईंदर महापालिकेत आयुक्त म्हणून गेल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कामे करण्याचा सपाटा लावला होता. याच दिलीप ढोलेंवर एकनाथ शिंदे यांचा राग अनावर झाला. एकेकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत असलेले मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या प्रतापामुळे रागाच्याभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढोले यांना सर्वांच्या समक्ष स्वतःच्या केबिनमधून गेट आउट म्हणत हाकलून लावले. शिंदे यांचा संताप इतका अनावर झाला होता की, त्यांनी स्वतःचा चष्मा देखील समोरच्या टेबलावर जोरदार आपटला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.