Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बडे नेते, अधिकाऱ्यांसोबत फोटो ते महागड्या गाड्या...

बडे नेते, अधिकाऱ्यांसोबत फोटो ते महागड्या गाड्या...
 

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीच्या फोनने राज्यभरात वातावरण ढवळून निघालं होतं. इंद्रजित सावंत यांनी स्वतः याबद्दलचा ऑडिओ आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला होता. "मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे." असं म्हणत इंद्रजित सावंत यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर केली होती. या प्रकरणात आता ज्या प्रशांत कोरटकर यांचं नाव समोर येत असलं, तरी प्रशांत कोरटकर यांनी ते आरोप फेटाळून लावले आहेत.

इंद्रजित सावंत यांनी केलेल्या या आरोपानंतर प्रशांत कोरटकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, त्यांनी ही ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं सांगून, आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे कोरटकर नेमके कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रशांत कोरटकर गेल्या 25 वर्षांपासून नागपुरात पत्रकार म्हणून कार्यरत आहे. एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये विदर्भ ब्युरो चीफ होते. त्यानंतर एका दुसऱ्या न्यूज चॅनलला विदर्भ चीफ म्हणून काम केलं. त्यांनतर माझा विदर्भ नावाचे स्वतःचे युट्युब चॅनल काढलं. सध्या तो याच चॅनलचे मुख्य संपादक आणि मालक आहे.

राज्यातील अनेक मोठ्या IAS, IPS अधिकाऱ्यांसोबत कोरटकर यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. अनेक राजकीय नेत्यांसोबतही त्यांचे जवळचे संबंध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेटीचे फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करून त्यांच्या जवळचा असल्याचं सांगून मंत्रालयात अनेक काम (ट्रान्सफर, पोस्टिंग) केल्याचंही म्हटलं जातं.

कोरटकर हे मर्सिडीज कार, महागडे मोबाईल वापरतात. नागपुरातील मनीष नगर परिसरात ते सध्या राहत असून, त्यांच्या परिवारात पत्नी आणि एक मुलगी आहे. अलीकडच्या काळात ज्योतिषविद्या शिकली असल्यंचे सांगून अनेक मोठे नेते आणि अधिकाऱ्यांना सल्ले देऊन नावलौकिक कोरटकर यांनी मिळवला आहे. कोरटकर नेहमी IPS अधिकाऱ्यांसोबतचे फोटो सोशल मीडिया वर नेहमी पोस्ट करत असतात. तसंच मुंबई, पुणे, इंदोर येथे त्यांचे आलिशान कार्यालय असल्याचे तो सांगतो. एकूणच, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा कोरटकर आणि हा कोरटकर एकच आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. तसंच जर तो कोरटकर हाच असेल, तर त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.