Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मटण मिळाले नाही म्हणून स्मशानभूमीतून आणला मृतदेह आणि...

मटण मिळाले नाही म्हणून स्मशानभूमीतून आणला मृतदेह आणि...



तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने रागाच्या भरात एक कुजलेला मृतदेह मांस दुकानासमोर फेकून दिला. कारण ऐकून सर्वांना धक्का बसला- जेव्हा कर्मचाऱ्याला दुकानातून मोफत मटण मिळाले नाही तेव्हा त्याने हे भयानक पाऊल उचलले. या घटनेतील आरोपीचे नाव कुमार असल्याचे सांगितले जात आहे, जो एका स्मशानभूमीत काम करतो. पूर्वी तो संगीता मटन स्टॉल नावाच्या मांसाच्या दुकानात काम करायचा, पण आता तो स्मशानभूमीत काम करत होता. घटनेच्या दिवशी तो दारू पिऊन दुकानात पोहोचला आणि त्याने मटण मागितले. दुकानदाराने नकार दिल्यावर कुमारने असे काही केले की कोणाचाही आत्मा थरथर कापेल.

 
थेनीमध्ये संगीता मटन स्टॉल नावाचे दुकान चालवणाऱ्या मनियारसनने कुमारला मटन देण्यास नकार दिला. मणियारसन म्हणाले की मटण खूप महाग झाले आहे आणि ते ते मोफत देऊ शकत नाही. यावर कुमार रागावला आणि दुकानातून निघून गेला. पण काही काळानंतर तो एवढं भयानक पाऊल उचलेल याची कोणालाही कल्पना नव्हती. मटण न मिळाल्याने संतप्त झालेला कुमार थेट स्मशानभूमीकडे निघाला. तिथे त्याने एक जुने, कुजलेले प्रेत उचलले आणि ते ओढत नेले आणि मणियारसनच्या दुकानाबाहेर फेकून दिले. हे दृश्य पाहून दुकानदार आणि तिथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले तेव्हा संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. दुकानाबाहेर कुजलेला मृतदेह पाहून लोक घाबरले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी प्रथम पालिका अधिकाऱ्यांना मृतदेह बाहेर काढण्यास सांगितले, परंतु ते तसे करण्यास तयार नव्हते. जेव्हा दुसरा कोणताही मार्ग उरला नाही तेव्हा पोलिसांनी स्वतः रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मृतदेह परत स्मशानभूमीत पाठवला. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.